Kolhapur, 03 september : शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांचा आज (ता. ३ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मोठ्या घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे.
घाटगे यांनी आज सकाळी हॉटेल पंचशील येथे पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांना घेऊन घाटगे हे त्यांच्या नागा पार्क येथील निवासस्थानी घेऊन गेले. त्या ठिकाणीही चर्चा झाली. दरम्यान, पक्ष प्रवेशा संदर्भात बोलताना समरजित घाटगे (Samarjeet Ghatge) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हा पहिला पक्षप्रवेश आहे, जो स्वतः शरद पवार कागलमध्ये येऊन मेळावा घेऊन करत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. विधानसभा निवडणूक लढणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ही मानाची गोष्ट आहे.
आता माझे गुरु शरद पवार आहेत, मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली काम करणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कागलमध्ये परिवर्तन करणार असल्याचे घाटगे यांनी स्पष्ट केले.
कागलमध्ये आज जे काही राजकीय व्यवस्थापन तयार झालं, ते शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे झाले आहे. ज्यांच्यासाठी केलं, त्यांना त्याचा विसर पडला आहे, त्यामुळे वस्ताद कोण आहे? आणि वस्ताद यांची ताकद काय आहे? हे आगामी निवडणुकीत कळणार आहे, असा टोला घाटगे यांनी विरोधक हसन मुश्रीफ यांना लगावला.
दरम्यान, सोमवारी मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी समरजीत घाटगे यांच्या पक्षप्रवेशापूर्वी त्यांच्यावर आरोप केला आहे. त्यावर बोलताना घाटगे यांनी, सत्ता त्यांच्यात हातात आहे, त्यांना हवं तर ते कारवाई करू शकतात. पण, अजून बरंच काही होणार आहे.
शरद पवारांचे भाषण अजून झालेले नाही तर ही अवस्था आहे. जर भाषण झालं तर काय अवस्था होईल? असा टोलाही पालकमंत्री मुश्रीफ यांना घाटगे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.