Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष, शरद पवारसाहेब कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील यांनी हॉटेल पंचशील येथे पवारसाहेबांची भेट घेतली. के. पी. पाटील महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक असून त्याच पार्श्वभूमीवर पवारसाहेबांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पवारसाहेबांच्या भेटीनंतर के. पी. पाटील यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत के. पी. पाटील ( K P Patil ) यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार केला होता. पण, आता पाटील यांनी मी महाविकास आघाडीतच असल्याचं सांगितलं आहे. पाटील यांच्या विधानानंतर कोल्हापुरात राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.
राधानगरी मतदारसंघातून उमेदवारी न मिळण्याचे संकेत मिळातच के. पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. यातच आज ( 3 सप्टेंबर ) पवारसाहेबांची (Sharad Pawar) कोल्हापुरातील पंचशील हॉटेल येथे के. पी. पाटील यांनी भेट घेतली.
भेटीनंतर के. पी. पाटील म्हणाले, "मी अजितदादांच्या राष्ट्रवादीत कधी गेलो होतो? मी कधी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला नाही. मी पहिल्यापासून येथेच आहे. मी कधीही अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. त्यामुळे पुन्हा पक्षप्रवेश करण्याचा प्रश्नच कुठे येतो? विधानसभेला मी महाविकास आघाडीसोबत राहणार आहे. अशी चर्चा शरद पवारसाहेबांशी करून आलो."
पण, लोकसभा निवडणुकीत माजी आमदार के. पी. पाटील यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार केला होता. त्याशिवाय जिल्ह्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत काम करणार असल्याची भूमिका के. पी. पाटील यांनी घेतली होती. मात्र, पालकमंत्री मुश्रीफ यांची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.