One Crore Bribe News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

One Crore Bribe News : एक कोटी लाच प्रकरण; गुंगारा देणारा 'गणेश वाघ' अखेर पोलिसांच्या पिंजऱ्यात...

Pradeep Pendhare

Ahemednagar News : एक कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार असलेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला अटक करण्यात लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाला यश आले आहे. 12 दिवसांपासून शोधावर असलेल्या पथकाला गणेश वाघ याला मुंबईकडून धुळ्याकडे जात असताना अटक करण्यात यश आले. वाघ याला थोड्याच वेळात न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने काम केले होते. या कामाच्या उर्वरित बिल मंजुरीसाठी गणेश वाघ याची बिलावर स्वाक्षरी गरजेचे होती. त्यावेळी गणेश वाघ हा नगरच्या कार्यालयात उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. गणेश वाघ याची बढतीवर बदली झाली. बिलावर स्वाक्षरीसाठी गणेश वाघ याने एक कोटी रुपयांची लाच मागितली. ही लाच नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड याच्याकडे देण्यास सांगितले होते. अमित गायकवाड ही लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने त्याला अटक केली. या लाचेमागील प्रमुख सूत्रधार गणेश वाघ असल्याचे तपासात समोर आले. परंतु कार्यवाहीच्या 3 नोव्हेंबरच्या दिवसापासूनच पसार झाला.

लाचलुचपत पथकाच्या नाशिक पथकाने गणेश वाघ याच्या शोधासाठी राज्य पिंजून काढले. तरीदेखील सापडत नव्हता. यातच गणेश वाघ याचे नातेवाईकदेखील बेपत्ता झाले. गणेश वाघ बाहेर देशात पळून जाऊ नये यासाठी लाचलुचपत विभागाने लूक आऊट नोटीस बजावली होती. दिवाळीत देखील पथक गणेश वाघ याच्या शोध घेत होते. शेवटी आज दिवाळी पाडव्याला पथकाला गणेश वाघ याला अटक करण्यात यश आले. नगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात गणेश वाघ याच्या अटकेची नोंदीनंतर न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी दिली.

वाघच्या शोधाचे ते बारा दिवस -

पसार गणेश वाघ याच्या शोधासाठी लाचलुचपत विभागाचे पथक 12 दिवस कार्यरत होते. गणेश वाघ याचा 12 दिवस पथक राज्यभर शोध घेत होते. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई, धुळे, नगर, बुलढाणा, बीड, सोलापूर या भागात पथकाने छापे घातले होते. लाचलुचपत विभागाने कारवाई केली त्यादिवाशी गणेश वाघ हा मुंबई मंत्रालयात होता. त्याला कारवाईची भनक लागताच तो मुंबईतूनच पसार झाला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT