Maan MIDC News : कॉरिडॉरबाबत देशमुखांची डबल ढोलकी; लोकांना चिथावण्याचा प्रकार : देशमुख

Jaykumar Gore म्हसवड येथील कॉरिडॉर एमआयडीसीवरून राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
Prabhakar Deshmukh, Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

-विशाल गुंजवटे

Maan Corridor MIDC News : मुंबई-बंगळुरू कॉरिडॉरअंतर्गत म्हसवड परिसरात होणाऱ्या एमआयडीसीबाबत राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुखांचा खरा घातकी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यांच्याच बगलबच्च्यांनी आणि फलटणकरांनी ही एमआयडीसी दुसरीकडे पळविण्याचा घाट घातला होता. एमआयडीसी जातेय म्हणून आंदोलनाची नाटकेही त्यांनीच केली होती. आता डबल ढोलकी देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते लोकांना चिथावणी देऊन मंजूर एमआयडीसीच्या मोजणीला विरोध करत आहेत, असा आरोप माण बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख यांनी केला आहे.

म्हसवड येथील कॉरिडॉर एमआयडीसीबाबत Maan Corridor MIDC राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख Prabhakar Deshmukh यांनी आमदार गोरेंवर Jaykumar Gore टीका केली होती. या टीकेला माण बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

देशमुख म्हणाले, दुष्काळामुळे आमच्या भागात रोजगाराच्या संधी नाहीत. आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने आता कुठे योजनांचे पाणी मतदारसंघात येऊ लागले आहे. रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने दळणवळण सुलभ होत आहे. या पार्श्वभूमीवर म्हसवड परिसरात केंद्र आणि राज्याकडून एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे.

सुरुवातीला राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी या एमआयडीसी इतरत्र नेण्याचा घाट घातला होता. त्याला प्रभाकर देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतून साथ दिली होती. एमआयडीसी बाहेर जातेय म्हणून आंदोलन करण्याची नौटंकीही केली होती.

Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
Maan Political News : माण, खटावला दुष्काळ जाहीर करा; जयकुमार गोरेंचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे

जयकुमार गोरेंनी कडाडून विरोध केल्याने आणि राज्य, केंद्रस्तरावर प्रयत्न केल्याने याच भागात एमआयडीसी होणार आहे. आमचे नेते आमदार जयकुमार गोरेंनी आरपारचे प्रयत्न करून तसा निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडल्याने पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रांत, कलेक्टर यांच्यासमवेत बैठका होऊन या भागातील शेतकऱ्यांना बागायती, घरे असणाऱ्या, फळबागांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जाणार नाहीत हे समजून सांगितले आहे. आता जमिनीची वर्गवारी केली जात आहे. मात्र, नेहमीप्रमाणे स्वार्थी राजकारण करणाऱ्या देशमुखांनी पुन्हा काही लोकांची दिशाभूल करून मोजणीला विरोध करायला लावला आहे. Maharashtra Political News

Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
Satara News : मराठा आरक्षणाची मागणी गांभीर्याने घ्या; माथाडी संघटना महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करेल : शशिकांत शिंदे

विरोध करणाऱ्यांवर कारवाई होताच, त्यांचे पुतना मावशीचे प्रेम जागे झाले आहे. एमआयडीसी होण्याला विरोध करायचा, व्हावी म्हणून आंदोलनाची नाटके करायची आणि आता मंजूर झालेल्या एमआयडीसी मोजणीलाही विरोध करायला त्यांनी सुरुवात केली आहे. देशमुखांचा स्वार्थी कावेबाजपणा जनता हाणून पाडणार असल्याचेही विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Umesh Bambare

Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
Pune Lok Sabha : धंगेकर, जोशी, शिंदेंनंतर आता माजी मंत्र्याने पुणे लोकसभेवर ठोकला दावा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com