Satara, 14 June : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने शुक्रवारी राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीची प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या रचनेत सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढणार असून आता जिल्हा परिषदेचे ६५ गट आणि पंचायत समितीचे १३० गण असणार आहेत.
दरम्यान, सातारा (Satara) महापालिकेच्या हद्दवाढीमुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या सातारा तालुक्यातील दोन गट आणि चार गण कमी होणार आहेत, तर निंबाळकरांच्या फलटण, गोरेंच्या खटाव आणि आमदार महेश शिंदेंच्या कोरेगाव तालुक्यात प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट वाढणार आहे. पंचायत समितीचे दोन गण वाढणार आहेत.
जिल्हा परिषद (Zillha Parishad) आणि पंचायत समितींच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी सातारा जिल्ह्यात ६४ गट आणि १२८ गण होते. त्यात आता अनुक्रमे एक आणि दोनची वाढ होणार आहे. याचा फायदा मंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे आणि फलटणच्या निंबाळकरांना होणार आहे. मात्र, वाढलेल्या गट आणि गणामध्ये आरक्षण काय पडणार, यावर येथील लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या गटाची आणि पंचायत समितीच्या गणांची रचना महाबळेश्वर तालुक्यापासून होणार आहे. मागील वेळीची रचना खंडाळा तालुक्यापासून झाली होती. ती आता महाबळेश्वर तालुक्यापासून प्रभागाची रचना आणि आरक्षण टाकले जाणार आहे.
सातारा महापालिकेची हद्दवाढ झाल्यामुळे तालुक्यातील शाहुपुरी आणि गोडोली हे जिल्हा परिषदेचे दोन गट कमी झाले आहेत. दोन गटांमुळे चार गणही कमी झाले आहेत. येथील गट कमी झाले असले तरी फलटण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात प्रत्येकी एक जिल्हा परिषदेचा गट आणि प्रत्येकी दोन गण वाढणार होणार आहेत. पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे सुमारे ३३ गट हे महिलांसाठी राखीव असणार आहेत.
लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण असणार आहे. कोणत्या गटात आणि गणात कोणते आरक्षण पडते, यावर तेथील इच्छुकांचा निवडणूक लढविण्याचा निर्णय होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय गट आणि गणांची संख्या पुढीलप्रमाणे (कंसात गणाची संख्या)
तालुका.............२०१७....................२०२५
खंडाळा........... ०३ (०६).................०३ (०६)
फलटण...............०७ (१४)..................०८ (१६)
माण....................०५ (१०)..................०५ (१०)
खटाव................... ०६ (१२).................. ०७ (१४)
कोरेगाव....................०५ (१०)...................०६ (१२)
वाई.......................... ०४ (०८)..................०४ (०८)
महाबळेश्वर...................०२ (०४)...................०२ (०४)
जावळी.........................०३ (०६)................. ०३ (०६)
सातारा...........................१० (२०)....................०८ (१४)
पाटण............................०७ (१४)......................०७ (१४)
कऱ्हाड........................... १२ (२४)......................१२(२४)
एकूण........................... ६५ गट.................................. १३० गण
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.