P N Patil News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

P N Patil News : पी. एन. पाटलांच्या जाण्याचा धसका; लाडक्या 'ब्रुनो'नेही सहा दिवसांतच सोडला प्राण!

Rahul Gadkar

Kolhapur News : एखाद्या व्यक्तीला जीव लागला की तो शेवटपर्यंत त्या व्यक्तीच्या सहवासात प्रेमात अगदी तुडुंब वाहून जातो. हीच गोष्ट जर एखाद्या मुक्या प्राण्याबाबत असेल तर अधिक स्पष्ट असतें. मुख्य प्राण्याला लावलेला जीव आणि त्याने दाखवलेली त्याप्रती इमानदारी नात्यातील सर्वोच्च केंद्रबिंदू ठरणारी गोष्ट असते. अशीच काही गोष्ट आमदार पी. एन.पाटील यांच्या जाण्याने घडली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून पाटील (P.N.Patil) यांच्यासोबत असणारा त्यांचा लाडका ब्रुनो हा श्वान देवाघरी निघून गेला आहे.

आपल्या माणसाप्रती असणारे प्रेम, इमानदारी, निष्ठा ब्रुनोच्या जाण्याने अगदी ठळक झाली आहे. आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पण आपला मालक गेल्या काही दिवसांपासून दिसत नाही. याचंच दुःख कदाचित घेऊन घरातला लाडका ब्रुनो गेल्या काही दिवसांपासून उपाशीच होता. अखेर त्यांनीही जीव सोडून पाटील कुटुंबियांचा निरोप घेतला.

मागील आठवड्यात म्हणजेच 19 मे रोजी पी एन पाटील हे आपल्या राहत्या घरी ब्रश करत असताना पाय घसरून पडले होते. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या मृत्यूमुळे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील काँग्रेस आणि जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. 23 मे रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आमदार पी एन पाटील यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असताना त्यांच्याच घरातील 'ब्रुनो' नावाचा श्वान त्या धक्क्यातून सावरला नाही. आमदार पी. एन. पाटील यांच्या घरी गेल्या 9 वर्षांपासून ब्रुनो घरचा सोबती होता. ज्या ज्यावेळी आमदार पाटील घरी जायचे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावेळी रिकाम्या वेळात ब्रुनो त्यांच्याशी वेळ घालवायचा. कुटुंबाशी हसत खेळत बागडत आणि एकमेकांच्या अंगावर उड्या मारत गेल्या नऊ वर्षांपासून ब्रुनो लहानाचा मोठा झाला होता. त्यामुळे साहजिकच पाटील कुटुंबाशी त्याची एक नाळ जुळली होती. मात्र आमदार पी एन पाटील हे दवाखान्यात उपचारासाठी गेल्यानंतर ब्रुनो देखील अस्वस्थ होता.

पी. एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ब्रुनोने काहीच खाल्लं नव्हतं. कुटुंबीयांनी त्याला अनेकवेळा भरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला देखील प्रतिसाद दिला नाही. मंगळवारी ब्रुनोने सुद्धा या जगातून अखेरचा निरोप घेतला. त्याच्या जाण्याने पाठवून कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT