Kolhapur Maharashtra Home Guard : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र काम करणाऱ्या होमगार्ड या पदासाठी राज्यात 55 हजार पदे मंजूर असून 46 हजार होमगार्ड सध्या सेवेत आहेत. त्यामुळे उर्वरित 9 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूरमध्ये 200 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असे अप्पर पोलिस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे नवीन महासमादेशक रितेशकुमार यांनी सांगितले. कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयास सोमवारी भेट देऊन त्यांनी कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
रिक्त असलेल्या जागा भरल्यास पोलिसांना मदत होणार आहे. यासाठी उर्वरित जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे रितेश कुमार (Ritesh Kumar) यांनी सांगितले. नवीन पद भरतीची अंतिम मंजरी मिळताच पुढील प्रक्रिया सरू होईल. कोणताही सण असो किंवा उत्सव निवडणूक काळात पोलिसांच्या बरोबरीने गृहरक्षक दलाच्या जवानांनी कामगिरी बजावत असतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यभरात सर्वच सण, उत्सव काळात होमगार्डची मदत घेण्यात येत आहे. बाहेरील बंदोबस्ताऐवजी होमगार्डचा (Maharashtra Home Gaurd) चांगला पर्याय उपलब्ध आहे. ही भरती प्रकिया झाल्यास त्यांना आणखीन सुविधा देण्यावर भर दिला जाईल. पोलिसांच्या मदतीला असलेल्या होमगार्डचे मानधन 670 रूपये असून त्यामध्ये वाढ करण्याचा विचारही सुरू असल्याचे यावेळी रितेशकुमार म्हणाले.
कोणताही आपत्कालीन परिस्थितीत होमगार्डनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेषतः पूर स्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, त्यांना पाण्यातून बाहेर काढणे, मदत केंद्रांची उभारणी करणे या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार होमगार्डना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली. (Latest Kolhapur News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.