Pandharpur Bazar Samiti Result Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bazar Samiti Result : प्रशांत परिचारकांचा अभिजित पाटलांना धक्का : पंढरपूर बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय

परिचारक यांना बाजार समितीच्या निवडणुकीत विठ्ठल परिवारातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके यांची साथ मिळाली होती.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे माजी (BJP) आमदार प्रशांत परिचारक (prashant Paricharak) गटाने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. बाजार समितीच्या१८ पैकी १८ जागा परिचारक गटाने मिळविल्या आहेत. अठरापैकी पाच जागा परिचारक गटाच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरीत १३ जागांवरही निवडणुकीत जिंकल्या आहेत. (Pandharpur Bazar Samiti dominated by Prashant Paricharak group)

परिचारक यांना बाजार समितीच्या निवडणुकीत विठ्ठल परिवारातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके यांची साथ मिळाली होती. काळे-भालकेंच्या साथीने परिचारक यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव केला आहे. या निवडणुकीत विठ्ठल परिवारातील नेत्यांमध्ये फूट पडली होती. आमदारकीसाठी इच्छूक असलेल्या पाटील यांच्या पॅनेलला प्रथमच हार पत्कारावी लागली आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक गटाने पंढरपूर बाजार समितीवर आपली सत्ता कायम राखली आहे. त्यांनी या निवडणुकीत विरोधी अभिजित पाटील गटाचा दारूण पराभव‌ केला आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलाची उधळण करत जल्लोष साजरा केला. पंढरपूर बाजार समितीवर परिचारक गटाची गेल्या २५ वर्षांपासून सत्ता आहे. ती परिचारक यांनी याही निवडणुकीत कायम राखली आहे.

दरम्यान, प्रशांत परिचारक गटाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती आणि व्यापारी मतदारसंघातील दोघांचा त्यामध्ये समावेश आहे

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

1) नागनाथ मोहिते (सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग)

2) वसंत चंदनशिवे ( ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती )

3) शिवदास वामन ताड (ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक)

व्यापारी मतदार संघ

१) यासीन अजीज बागवान

२) सोमनाथ सदाशिव डोंब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT