Solapur News : पंकजाताई, तुम्ही मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका. तुमच खरंच मराठा समाजावर प्रेम असेल तर मराठ्यांना इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) पन्नास टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षणाची तुम्ही मागणी करा, हा सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. प्रसंगी रक्त सांडेल, अशा शब्दांत सकल मराठा समाजाचे सोलापूर अध्यक्ष माऊली पवार यांनी पंकजा मुंडे यांना सुनावले. (Pankajatai, Get reservation for Maratha community from OBC : Mauli Pawar)
बीडमधील (Beed) एका कार्यक्रमात शुक्रवारी (ता. ३० जून) बोलताना मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, अशी घोषणा केली होती. त्या या घोषणेचे पडसाद राज्यात उतरताना दिसत आहे. त्यातून सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी पंकजा मुंडे (Pankaja munde) यांना सुनावले आहे.
माऊली पवार म्हणाले की, पंकजाताई, बरं वाटलं तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणाची आठवण झाली. पण, २०१८ मध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना आपण मराठा आरक्षण समितीमध्ये होता. मराठा समाजाला आरक्षण देणार म्हटल्यानंतर आपण त्या बैठकीतून उठून गेला होता. आपण कॅबिनेट मंत्री असताना देण्यात येणाऱ्या आरक्षणाला आपण किती पाठिंबा दिला होता, हे मराठा समाज चांगले जाणतो. तुमच्या राजकारणासाठी मराठा तरुणांच्या भावनांशी खेळू नका.
आरक्षणासाठी मराठा समाज २०१६-१७ मध्ये लाखोंनी रस्त्यावर उतरला होता, त्यावेळी तुम्ही पाठिंब्याचे साधं पत्रदेखील काढलं नव्हतं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की, तुम्ही बीडच्या क्रांती मोर्चातसुद्धा सामील झाला नाहीत. हे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज चांगलेच जाणतो. आज तुमच्या राजकीय स्वार्थापोटी ‘जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही’, असे तुम्ही म्हणत आहात. असलं कोरडं प्रेम तुम्ही मराठा समाजावर दाखवू नका. स्वतःची राजकीय वाटचाल अडचणीत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषयाचा फायदा घेऊन मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा खोटा प्रयत्न मराठा समाज खपवून घेणार नाही, असा इशाराही माऊली पवार यांनी दिला.
पवार म्हणाले की, मराठा समाजावर तुमचे खरेच प्रेम असेल तर ओबीसीमधून पन्नास टक्क्यांमधून मराठा आरक्षण देण्याची मागणी तुम्ही करा. हा सकल मराठा समाज तुमच्या राजकीय भवितव्यासाठी जिवाची आहुती देईल. स्वतःचे रक्त सांडेल. पण पंकजाताई, तुम्ही मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका. तुमचं खरंच प्रेम असेल तर मराठा समाजाला ओबीसीमधून पन्नस टक्क्यांच्या आतमध्ये तुम्ही मागणी करा, हा सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. ...नाहीतरी हल्ली फेटा आणि तुमचा संपर्क राहिलाच नाही...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.