Shinde Government Anniversary : फडणवीस व टीम आमच्या धाडसाच्या पाठीशी उभी राहिली अन्‌ बंड यशस्वी झाले; वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात शिंदेंचे विधान

राज्यात २०१९ मध्ये शिवसेना-युतीला जनतेने बहुमताने निवडून दिले होते. पण, दुर्दैवाने निकाल येऊ लागताच काहींनी ‘आम्हाला सगळे दरवाजे उघडे आहेत,’ असे इशारे द्यायला सुरुवात केली.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Thane Anniversary program : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल, असे मलाही वाटलं नव्हतं. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माझ्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. या एकनाथ शिंदेंने जे धाडस केलं, त्या धाडसाच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम उभी राहिली आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Fadnavis and his team stood by our revolt and the revolt was successful: Eknath Shinde)

ठाण्यातील टेंभीनाका येथील धर्मवार आनंद दिघे आश्रमात युती सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात २०१९ मध्ये शिवसेना (shivsena)- भाजप (BJP) युतीला जनतेने बहुमताने निवडून दिले होते. पण, दुर्दैवाने निकाल येऊ लागताच काहींनी ‘आम्हाला सगळे दरवाजे उघडे आहेत,’ असे इशारे द्यायला सुरुवात केली. लोकांना नको ते झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तत्कालीन सरकारने देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारच्या योजना बंदल केल्या.

Eknath Shinde
Beed News : बीडमध्ये २०१९ ला काही ठिकाणी ॲक्सिडेंट झाले; पंकजांच्या पराभवावर बावनकुळेंचे भाष्य

शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आले होते, शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होते. शिवसेना वाचविण्यासाठी आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण रोखण्यासाठी भलतचं धाडस करावं लागलं. ते धाडस करणं सोपं नव्हतं. शिवसेना अमदारांच्या मनात उद्रेक होता, त्याला वाचा फोडण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. सरकार स्थापन केले आणि सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं, असा दावा शिंदे यांनी केला.

Eknath Shinde
Rahul Kanal News : 'चलो अच्छा है, सबको पता चले के इगो और ॲरोगन्स क्या होता है…' ; राहुल कनालांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मागील वर्षभरात आम्ही सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. वैयक्तीक लाभाचा एकही निर्णय आम्ही घेतला नाही. आपण सर्वांनी साथ दिली, प्रसंग बाका होता. काही लोक ठामपणे पाठीशी होते, काहीजण संभ्रमित होते. आतापर्यंत मी असे अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यापाठीमागे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आशीर्वाद होते, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Eknath Shinde
Ambadas Danve Statement: संतोष बांगरांच्या मंत्रिपदाच्या दाव्यावर अंबादास दानवेंची भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले ‘...तर मटक्याला...’

वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पाहून समाधान वाटलं

शिंदे म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचाराची मर्यादा दीड लाखावरून पाच लाखांपर्यंत केली. राज्यातील साडेबारा कोटी लोकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातील, असा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथे काल वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून वर्षभरात केलेल्या कामाचे समाधान वाटत होते.

Eknath Shinde
Solapur DCC Bank : माजी मंत्री, बड्या नेत्यांसह माजी अधिकाऱ्यांचा नोटिसा स्वीकारण्यास नकार

उद्योगक्षेत्रात आपण पुन्हा एक नंबरवर आलो

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्योगधंद्यात महाराष्ट्र एक नंबरवर होता. मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योग क्षेत्रात आपली पीछेहाट झाली. पण, अवघ्या वर्षभराच्या कालावधीत आपण पुन्हा एक नंबरवर आलो आहोत, असा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com