prakash abitkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Parliamentarian Award : कोल्हापुरातला 'हा' आमदार ठरला 'लै भारी', मिळवला उत्कृष्ट संसदपटूचा बहुमान

The award was presented to prakash Abitkar by President Draupadi Murmu : महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेतील “उत्कृष्ट संसदपटू” व “उत्कृष्ट भाषण” वर्गातील पुरस्कारांचे वितरण आज विधान भवन करण्यात आले.

Rahul Gadkar

सभागृहात आपल्या प्रभागासह कोल्हापुरातील शेतकरी आणि अन्य वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि संविधान वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर आघाडीवर आहेत. त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघात निधी उपलब्ध करून ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी यशस्वीपणे आबिटकर यांनी पार पडली आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांना सन २०१९ - २० चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईत भवनात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार आबिटकर यांना देण्यात आला.

आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी सन २०१४-२०२४ अशा १० वर्षांच्या कार्यकाळात विधानसभा कामकाजात सहभाग घेत तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अशासकीय विधेयके, औचित्याचे मुद्दे, अल्प सूचना, अर्धा-तास चर्चा, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा, विभागवार चर्चा, अर्थसंकल्पीय भाषण चर्चा विविध विधेयकांवेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला आहे. इतकेच नव्हे तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर शोधून त्याची सोडवणूक केली आहे.

दरम्यान या सन्मानानंतर ते म्हणाले , 'खरं तर हा माझा सन्मान नसून राधानगरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे. मतदारसंघाला विविध योजनातून भरीव निधी यावा आणि मतदारसंघ संपूर्ण विकसित व्हावा अशी माझी मनोमन इच्छा राहिली आहे. आणि ते मी करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करत असताना विधिमंडळातील माझ्या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Droupadi Murmu) यांच्या हस्ते मला उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाला.

गेल्या दहा वर्षात 'या' प्रश्नावर उठवला आवाज

गेल्या दहा वर्षात आमदार प्रकाश आबिटकर यांनी विविध मुद्द्यांवरून आपलं लक्ष केंद्रीत केले. मराठा आरक्षण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न, लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, राज्यातील पोलिस पाटलांचे मानधन वाढ, कोतवालांचे विविध प्रश्नांची सोडवणूक, होमगार्ड यांचे वेतन वाढ व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, माध्यमिक शिक्षकांच्या शाळांची अनुदान वाढ, अंशकालीन कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत घेणे, राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरण, आरटीओ पदभरतीतील उमेदवारांची नियुक्त्या.

शासकीय सेवेतील एम.एस.सी.आयटी न केलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, लाकूड व्यवसायीकांचे प्रश्न, कंत्राटी तत्वावर शासन सेवेत असलेल्या कर्मचार्यांचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न, ग्रामपंचायत मधील डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे प्रश्न, अनुकंपा पदभरती, शासकीय तसेच निमशासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न, एसटी महामंडळातील प्रलंबित पद भरती, कृषी कायदे सक्षमीकरण करणे, कामगार कायदे सक्षमीकरण करणे, या सह मतदारसंघातील प्रलंबित सिंचन प्रकल्प, रस्ते, वीज, प्रशासकीय इमारती, राधानगरी धरण व अभयारण्य, तालुक्यातील ८४ गावांचे पर्यटन प्राधिकरण, प्रादेशिक पर्यटन निधीतून पर्यटन विकास, ब वर्ग देवालयांना मान्यता अशा विविध कामातून आपला ठसा उमटवण्याचे काम केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT