Mahayuti Government : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीसाठी महायुतीकडून कोणी नेतृत्व करावे, यासाठी नेते चाचपणी करत आहेत. जागावाटपासाठी सर्वेक्षण झाल्याचेही समजते. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची पीछेहाट होत असल्याचे समोर आले आहे. तर या या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद दिसली आहे.
नागपूर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Sinde) यांच्या शासकीय निवासस्थानी शनिवारी महायुतीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीने केलेल्या सर्वेक्षणाची माहिती संबंधित कंपन्यानी सादर केली. यावेळी युतीतील तिन्ही पक्षांतील जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे समजते. या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.
महायुतीने विविध कंपन्यांकडून निवडणुकीसाठी सर्वेक्षण केले आले आहे. निवडणुकीची रणनीती कशी असावी, महायुतीतील (Mahayuti) कोणत्या चेहऱ्याला पुढे आणावे याचा गांभीर्यांने विचार सुरु आहे. या सर्वेक्षणामध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तुलनेने मागे असल्याची माहिती मिळत आहे. तसेच महायुतीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शिंदे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे आल्याचे समजते. या बैठकीत महाराष्ट्रातील विभागनिहाय रणनीती कशी आखायला हवी तसेच महाविकास आघाडीसोबत दोन हात करतांना कशी खेळी खेळणे अपेक्षित आहे, जागावापट कसे असावे, अशा विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाला (Shivsena) आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपामध्ये अधिक भक्कमपणे भूमिका घेता येणार आहे. अजित पवार गटानेही आतापासूनच जागावर दावा सुरू केला असला, तरी पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अद्याप पाहिजे तेवढा मजबूत झालेला नाही. विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या मुद्यांवर लढवल्या जातात. लोकसभा निवडणुकीचे मुद्दे यावेळी राज्याच्या निवडणुकीत उपयोगी पडणार नाहीत. मोदी करिश्माही उपयोगाला येणार नाही. त्यामुळे महायुतीच्या अचूक रणनीती आखावी लागणार आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. या योजनेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादाचे मतदानात रूपांतर होणार की नाही याहद्दल साशंकता आहे. महायुतीला विजयापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक गणितांचा अभ्यास करून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे हे नक्की.
लोकसभेच्या निकालांचा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये दिसण्याची शक्यता कमी असते. विधानसभा निवडणुकीत त्या वेळेचे स्थानिक घटक अधिक आणि स्थानिक विषय महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा भाजप आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी बऱ्यापैकी चालत असल्याची चर्चा आहे. जर खरचं शिंदेंना पुढे केल्याने अपेक्षित असा परिणाम येणार आहे का? हवा तो रिझल्ट मिळणार आहे का यांचेही चिंतन या बैठकीत करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.