Sharad Pawar-Ram Satpute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pawar Markadwadi Tour : पवारसाहेब, मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनीही बघा; सातपुतेंचे आवाहन

Ram Satpute Appeal To Sharad Pawar : मारकडवाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि राम सातपुते यांचे बॅनर लागले आहेत. तसेच, माजी आमदार राम सातपुतेंनी समाज माध्यमांमधून शरद पवार यांना पाच वर्षात केलेल्या विकास कामांची पाहणी करण्याची विनंती केली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 December : ‘ईव्हीएम’च्या विरोधात उठाव करणारे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांच्या भेटीसाठी उद्या (रविवार, ता. ०८ डिसेंबर) ज्येष्ठ नेते शरद पवार येत आहेत. मारकडवाडीत येणाऱ्या पवारांचे माजी आमदार राम सातपुते यांनी उपहासात्मक स्वागत केले असून पवारसाहेब, मी केलेली विकासकामे पाहण्यासाठी मारकडवाडीत येत आहे. त्यांनी मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनीही पाहाव्यात, अशी विनंतीही केली आहे.

मारकडवाडीत उद्या रविवारी शरद पवार (Sharad Pawar) येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मारकडवाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि राम सातपुते यांचे बॅनर लागले आहेत. तसेच, माजी आमदार राम सातपुतेंनी समाज माध्यमांमधून शरद पवार यांना पाच वर्षात केलेल्या विकास कामांची पाहणी करण्याची विनंती केली आहे.

राम सातपुते (Ram Satpute) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मारकडवाडीत उद्या शरद पवारसाहेब येणार आहेत. मी केलेल्या विकास कामांची पाहणी करायला ते येत आहेत. आम्ही मारकडवाडीमध्ये मागील ५ वर्षात २१ कोटी ८९ लाख रुपयांची विकासकामे केली आहेत. पवारसाहेब मारकडवाडीमध्ये आम्ही बोटींग पर्यटन केंद्रपण सुरू केलं आहे, त्याचाही आपण लाभ घ्यावा, असे आवाहन सातपुते यांनी केले आहे.

मोहिते पाटलांचा हा खोटा नेरेटिव्ह चालणार नाही. उद्या येणारच आहात तर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, अकलूज परिसरातील मोहितेंनी शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी, शेतकऱ्यांना लुटत असलेले कारखाने पण पहावेत. तसेच, शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला आणि उत्तम जानकर यांनी विकलेला चांदापुरी साखर कारखानापण पाहावा, अशी विनंती राम सातपुते यांनी शरद पवार यांना केली आहे.

लाँग मार्चचे नियोजन

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या मारकडवाडीत येणार आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढण्याचे निश्चित झाले असून तयासाठी उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आदींना आमंत्रित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT