Phaltan Palika
Phaltan Palika sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

फलटण पालिका : आरक्षणाने केली दिग्गजांची गोची, तर महिलांना संधी...

सरकारनामा ब्युरो

फलटण : फलटण नगरपालिकेच्या आज झालेल्या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. महिलांसाठी १४ जागा राखीव झाल्याने इच्छुकांना आता आपल्या घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी करावी लागणार आहे. फलटण पालिकेत २७ नगरसेवक असणार असून यातील पाच अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव तर १४ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत.

फलटण नगरपरिषेच्या प्रभाग रचनेनुसार आज प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड उपस्थित होते. यावेळी फलटण शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

फलटण पालिकेवर गेल्या ३० वर्षांपासून सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाच्या ताब्यात आहे. आगामी काळात पुन्हा सत्ता कायम ठेवण्यासाठी राजे गटाकडून प्रयत्न होणार आहे. तर माढाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

आज झालेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती पुढील प्रमाणे आहेत. प्रभाग एक (अ, ब) - श्रीराम कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुजारी कॉलनी, नगर परिषद वॉटर वर्क्स, श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय, फिरंगाई मंदिर. आरक्षण अ- अनुसूचित जाती-महिला, ब- सर्वसाधारण खुला. प्रभाग दोन - बुद्ध विहार, रानडे पेट्रोल पंप, बँक ऑफ बडोदा, मटण मार्केट, मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह. अ- अनुसूचित जाती-महिला, ब- सर्वसाधारण खुला.

प्रभाग तीन - कुरेशी मस्जिद, जैन मंदीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदीर, लक्ष्मीमाता मंदीर, स्मशानभूमी. अ-अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण खुला- महिला. प्रभाग चार - हरिबुवा मंदीर, महादेव मंदीर, गणेश नगर, फलटण इंडस्ट्रीज जुनी इमारत, निमकर सिडस्‌, बॅरिस्टर राजाभाऊ भोसले बंगला, महाराजा हॉटेल, बोरावके शोरूम. अ- अनुसूचित जाती- महिला, ब- सर्वसाधारण खुला.

प्रभाग पाच - श्रीकृष्ण बेकरी, संतोषी माता मंदीर, काळुबाई मंदीर, गणपती मंदीर. अ- सर्वसाधारण खुला महिला, ब- सर्वसाधारण खुला. प्रभाग सहा - बुधवार पेठ, लाटकर तट्टी, ईदगाह तळे, दफन भूमी, खंडोबा मंदीर. अ- सर्वसाधारण खुला-महिला, ब-सर्वसाधारण खुला. प्रभाग सात- पाचबत्ती चौक, बादशाही मस्जिद, फलटण गेस्ट हाऊस, हत्तीखाना, टाळकुटे मंदीर, श्रीराम पोलिस चौकी, कुंभार टेक. अ- सर्वसाधारण खुला महिला, ब- सर्वसाधारण खुला.

प्रभाग आठ - फलटण नगरपरिषद इमारत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एसटी स्टॅण्ड, श्रीराम हायस्कुल, व्होरा बेबी केअर सेंटर, स्पंदन हॉस्पिटल. अ- सर्वसाधारण खुला महिला, ब- सर्वसाधारण खुला. प्रभाग नऊ - फलटण लाईफ लाईन हॉस्पिटल, कॅनरा बँक, नारळी बाग, संत ज्ञानेश्वर मंदीर, विश्रामगृह, माळजाई मंदीर, मुधोजी हायस्कुल. अ- सर्वसाधारण खुला - महिला, ब- सर्वसाधारण खुला.

प्रभाग दहा -दगडी पुल, हनुमान मंदीर,श्रक्षराम मंदीर, जैन मंदीर, नवलबाई कार्यालय, महादेव मंदीर स्वामी समर्थ मंदीर. अ- सर्वसाधारण खुला महिला ब- सर्वसाधारण खुला. प्रभाग अकरा- रंगशिळा मंदिर, आबासाहेब मंदिर, ग्रामीण पोलिस स्टेशन, मुधोजी कॉलेज, हरीनारायण टेकडी मंदिर, बाहुबली जिनींग फॅक्टरी. अ - सर्वसाधारण खुला - महिला, ब - सर्वसाधारण खुला.

प्रभाग बारा- तहसिल व प्रांत कार्यालय, सत्र न्यायालय, पद्मावती नगर, श्रीखंडे मळा, भडकमकर नगर, पोलिस स्टेशन, मध्यवर्ती इमारत. अ- अनुसूचित जाती, ब - सर्वसाधारण खुला - महिला. प्रभाग क्रमांक 13- गोळीबार मैदान, विद्यानगर, संजीवराजे नगर, हाडको कॉलनी, लक्ष्मी विलास व्हिला. अ- सर्वसाधारण खुला -महिला, ब- सर्वसाधारण खुला- महिला, क- सर्वसाधारण खुला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT