पाचगणी पालिका : आरक्षणामुळे 'कही खुशी कही गम'

प्रारंभी ज्या प्रभागात अनुसूचित जाती जमातींची SCST लोकसंख्या Population अधिक आहे, असे प्रभाग राखीव Reserve ठेवण्यात आले. या नियमानुसार प्रभाग ९, ३ ,२ व ८ हे प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवले.
Panchagani Palika Reservation
Panchagani Palika Reservationsarkarnama
Published on: 
Updated on: 

भिलार : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषेदच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेनंतर आज आरक्षण सोडती काढण्यात आल्या. या आरक्षणामुळे पाचगणीच्या राजकारणात 'कही खुशी कही गम ' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काहींना आपला पूर्वीचा प्रभाग व हक्काचा विभाग आरक्षणामुळे गमवावा लागला आहे. तर काहींना इतर प्रभागात स्थलांतरित होवून आपले नशीब आजमावे लागणार आहे. आजच्या सोडतीत सर्वसाधारण पुरुष आठ, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी दोन, अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी दोन तर सर्वसाधारण महिलांसाठी आठ असे आरक्षण आज जाहीर करण्यात आले.

पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेनंतर होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे पांचगणीकरांचे लक्ष लागून राहिले होते. आज पालिकेच्या छ्त्रपती शिवाजी सभागृहात या सोडतीसाठी विशेष सभा झाली. यामध्ये सोडती काढण्यात आल्या. पाचगणी पालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत नियंत्रक अधिकारी अर्चना नाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पवार उपस्थित होते.

Panchagani Palika Reservation
स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी देशात अव्वल; सात शहरांना 'थ्री स्टार' रॅकिंग

प्रारंभी ज्या प्रभागात अनुसूचित जाती जमाती लोकसंख्या अधिक आहे, असे प्रभाग अनुसूचित जाती जमातींच्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. या नियमानुसार प्रभाग ९, ३ ,२ व ८ हे प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. अनुसूचित जातीच्या महिला व पुरुष यांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे शालेय चिमुकल्यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यानंतर नियमानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग एक (अ.. सर्वसाधारण महिला राखीव ब.... सर्वसाधारण ), (प्रभाग दोन अ...अनुसूचित जाती महिला राखीव, ब....सर्वसाधारण ), प्रभाग तीन (अ.. अनुसूचित जाती सर्वसाधारण ब.... सर्वसाधारण महिला ).

Panchagani Palika Reservation
वाधवान कुटुंब शाळेत मुक्कामाला : अलिशान गाड्या `ईडी`ने ताब्यात घेतल्या आणि पाचगणी ठाण्यात लावल्या

प्रभाग चार (अ...सर्वसाधारण महिला ,ब....सर्वसाधारण ), प्रभाग पाच ( अ.. सर्वसाधारण महिला ,ब.... सर्वसाधारण ), प्रभाग ६ (अ.. सर्वसाधारण महिला ,ब.... सर्वसाधारण ), प्रभाग सात (अ.. सर्वसाधारण महिला ,ब.... सर्वसाधारण ), प्रभाग आठ (अ.. अनुसूचित जाती महिला राखीव, ब.... सर्वसाधारण ), प्रभाग नऊ (अ.. अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब.... सर्वसाधारण महिला ) , प्रभाग दहा (अ.. सर्वसाधारण महिला ,ब.... सर्वसाधारण ).

Panchagani Palika Reservation
'किसन वीर'चा यावर्षीचा हंगाम यशस्वी करणार... मकरंद पाटील

या आरक्षणामुळे पाचगणीच्या राजकारणात 'कही खुशी कही गम ' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काहींना आपला पूर्वीचा प्रभाग व हक्काचा विभाग आरक्षणामुळे गमवावा लागला आहे. तर काहींना इतर प्रभागात स्थलांतरित होवून आपले नशीब आजमवावे लागणार आहे. तर पहिल्यांदाच ओबीसी आरक्षण सोडून निवडणूक होत असल्याने ओबीसी इच्छुक नाराज झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.