Karmala News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala news : करमाळ्यात मराठा आक्रमक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन्‌ आरोग्य मंत्र्यांच्या फोटोला काळे फासले

Maratha Reservation News : दोन दिवसांपूर्वी करमाळा बस स्थानकातील एसटी बसवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेतेमंडळींच्या फोटोला काळे फासण्यात आले होते.

Vijaykumar Dudhale

karmala : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. बीडमधील माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंखे यांचे घर पेटवून देण्यात आले. त्यानंतर करमाळ्यात तहसील कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या बॅनरवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला मराठा कार्यकर्त्यांनी काळे फसले. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोलाही काळं फासण्यात आले होते. (Photos of CM , Deputy CM and Health Minister were blackened in Karmala)

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर चक्रीय उपोषण सुरू असून, त्याचा आज पाचवा दिवस आहे. करमाळा तहसील कार्यालयासमोर सरकारच्या वतीने लावण्यात आलेल्या उत्सव नवरात्रीचा...महाराष्ट्राच्या आरोग्याचा मोफत महाआरोग्य शिबिर हा बॅनर लावला आहे. तुळजापूर (जि. धाराशिव) येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने हे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचा हा बॅनर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे फोटो आहेत. याच फोटोला कार्यकर्त्यांनी काळे फासून मराठा तरुणांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे ठरावही करमाळा तालुक्यातील ४० पेक्षा जास्त गावांनी केले आहेत.

दोन दिवसांपूर्वी करमाळा बस स्थानकातील एसटी बसवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेतेमंडळींच्या फोटोला एक मराठा लाख मराठा.... मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा देत काळे फसण्यात आले होते. त्यानंतर आज (सोमवारी, ता.३० ऑक्टोबर) करमाळा तहसील कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या बॅनरवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या फोटोला काळे फासले आहे.

करमाळा येथे सुरू असलेल्या चक्री उपोषणाला रविवारी (ता. २९ ऑक्टोबर) महिलांनी मोठी उपस्थिती दर्शवत घोषणाबाजी केली. दुसरीकडे साडे (ता. करमाळा) येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, गुणरत्न सदावर्ते यांच्या पोस्टरला जोडे मारून त्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT