Dr. Shirish Valsangkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी डॉक्टराच्या मुलासह सुनेची चौकशी

Solapur Crime News : शवविच्छेदनावेळी डॉ. वळसंगकर यांच्या खिशात एक ससाइट नोट सापडली हेाती. त्याआधारे डॉ. अश्विन वळसंगकर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 April : सोलापूरचे न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी डॉक्टरांची सून शोनल वळसंगकर यांची चौकशी केली आहे. त्या अगोदर डॉक्टरांचे चिरंजीव डॉ अश्विन यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यामुळे तपासअंतीच डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचे गूढ उकलणार आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी शुक्रवारी (ता. १८ एप्रिल) राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. शवविच्छेदनावेळी डॉ. वळसंगकर यांच्या खिशात एक ससाइट नोट सापडली हेाती. त्याआधारे डॉ. अश्विन वळसंगकर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पाेलिसांनी तातडीने शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिला शनिवारी (ता. १९ एप्रिल) अटक केली होती.

चौकशीत मनीषा मुसळे माने ही समाधानकारक उत्तरे देत नसल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली. गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांकडून सध्या सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे, त्या अनुषंगानेच डॉ. वळसंगकर यांच्या सूनबाई शोनल वळसंगकर यांचीही सोमवारी पोलिसांनी चौकशी केली. आज पुन्हा सुनेची सखोल चौकशी होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शोनल वळसंगकर यांच्या आधी त्यांचे पती अश्विन वळसंगकर यांचीही चौकशी करण्यात आली आहे. असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी अजित लकडे यांनी सांगितले. मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आल्यानंतर तिच्या वकिलाने मोठा दावा केला होता. प्रख्यात मेंदूरोग तज्ज्ञ असणारे डॉ. वळसंगकर आत्महत्येच्या धमकीच्या कारणामुळे आत्महत्या करणे शक्य नाही. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून ती बाहेर येऊ नये, यासाठी खोटी केस मनीषा मुसळे माने हिच्यावर करण्यात आली आहे, असा युक्तिवाद ॲड. प्रशांत नवगिरे यांनी केला आहे.

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे माने हिची पोलिस कोठडी बुधवारी (ता. २३ एप्रिल) संपणार आहे. त्यानंतर मुसळे माने हिला पुन्हा न्यायालयात उभे केले जाणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT