Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास अधिकारी बदलला: संशयित महिलेसह डॉक्टरांचा मोबाईल जप्त; संभाषण, चॅटिंग ठरणार महत्वपूर्ण

Solapur Crime News : पोलिसांनी डॉ. वळसंगकर आणि मनीषा मुसळे माने हिचा मोबाईल जप्त केला असून त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास अधिकारी बदलण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सोपविण्यात आले आहे.
Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish Valsangkar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 April : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात आली आहे. डॉ. वळसंगकर यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी डॉ. वळसंगकर आणि मनीषा मुसळे माने हिचा मोबाईल जप्त केला असून त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास अधिकारी बदलण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सोपविण्यात आले आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar ) हे शुक्रवारी (ता. १८ एप्रिल) रात्री पत्नी डॉ. उमा वळसंगकर आणि मुलगी नेहा यांच्यासमवेत घरात गप्पा मारत बसले होते. मात्र, त्या चर्चेतून उठून डॉ. वळसंगकर यांनी बाथरूममध्ये जाऊन बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. शवविच्छेदनावेळी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पॅन्टीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. त्या चिठ्ठीच्या आधारे डॉ. वळसंगकर यांचा मुलगा डॉ. अश्विन वळसंगकर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार शनिवारी रात्री (ता. १९ एप्रिल) हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात आली आहे.

मनीषा मुसळे-माने (Manisha Musale Mane) हिने १७ एप्रिल रोजी डॉक्टरांना मेल पाठवून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. माझा पगार कमी केला, अधिकारही कमी केले, त्यामुळे मी दोन्ही मुलांना मारणार आणि हॉस्पिटलमध्ये (Hospital) येऊन पेटवून घेणार. माझ्याबद्दल चुकीचे आणि खोटे पसरविले जात आहे. त्याला स्टाफमधील लोक आणि वळसंगकर कुटुंबीय जबाबदार राहाल, असा मेल मनीषा मुसळे माने हिने केला होता. त्यानंतर डॉक्टरांनी मुसळे-माने हिला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले होते. त्यावेळी तिने माफीही मागितली होती. पण त्याच दुसऱ्याच दिवशी डॉ. वळसंंगकर यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागचे गूढ वाढले आहे.

Dr. Shirish Valsangkar
Sawant Family : सावंत कुटुंबीयांत गृहकलह?; शिवाजीरावांच्या कार्यक्रमातून तानाजीरावांचे फोटो गायब!

डॉ. वळसंगकर यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत ‘ज्या माणसाला मी शिकवून ‘एओ’ (प्रशासकीय अधिकारी) केले, चांगला पगार दिला, त्यानेच माझ्यावर घाणेरडे आरोप करून मला धमकावले, त्याचे मला अतीव दु:ख आहे. म्हणून मी जीवन संपवत आहे’ असे चिठ्ठीत म्हटले होते. त्याखाली शिरीष असे लिहिले असून मुसळेचाही उल्लेख आहे.

पोलिसांनी डॉ. शिरीष वळसंगकर आणि संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिचा मोबाईल जप्त केला आहे. मुसळे-माने हिच्या मोबाईलमध्ये वळसंगकर कुटुंबातील काही सदस्यांसोबतचे संभाषण आणि व्हॉट्‌स ॲप चॅटिंग असल्याचे सांगितले जात आहे. मुसळे-माने हिनेही तिच्या वकिलांनाही काही बाबी सांगितल्या. वळसंगकर कुटुंबीयांतील वादाबाबत वकिलांना सांगितले आहे.

Dr. Shirish Valsangkar
Eknath Shinde Solapur Tour : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूर दौरा रद्द; सावंत कुटुंबातील ‘हे’ कारण चर्चेत....

वळसंगकर हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-मानेविरुद्ध डॉ. अश्विन वळसंगकर यांनी १९ एप्रिल रोजी रात्री सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावेळी फौजदार संजीवनी व्हट्टे या तपास अधिकारी होत्या. व्हट्टे यांनीच मनीषाला तिच्या घरून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जप्त करण्यात आलेले साहित्य फॉरेन्सिक लॅबला पाठविण्याची तयारी तपास अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र या गुन्हाचा तपास आता वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com