devendra fadnavis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : पोलीस ठाण्यात बोलावले, ताकीद दिली, तरीही शिवप्रेमी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणारच !

Police Warning to Protesters News : आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन न करण्याची विनंती केली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं इंडिया आघाडीकडून जाहीर केले.

Rahul Gadkar

Kolhapur news : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या डॉ. प्रशांत कोरटकरला अटक करावी, अशी मागणी कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर यांना अटक करूनच कोल्हापुरात यावे, अन्यथा अडवण्याचा इशारा इंडिया आघाडीकडून देण्यात आला होता. मात्र, आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन न करण्याची विनंती केली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं इंडिया आघाडीकडून जाहीर केले.

प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या इंडिया आघाडी व शिवप्रेमी संघटनांना राजवाडा पोलीस स्टेशन (Police) मध्ये बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. या बैठकीत राजवाड्याचे पोलीस निरीक्षक झाडे यांनी आंदोलन न करण्याबाबत ताकीद दिली. न्यायालयाने कोरटकर यांना अकरा तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

आम्ही तपास करत आहोत. त्यामुळे तुम्ही पुकारलेले आंदोलन हे स्थगित करावे, अशी विनंती केली. पण कोरटकर यांचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्यासोबतचे फोटो आहेत. राजकीय नेत्यांसोबत फोटो आहेत. त्यामुळे काही तपासाला अडथळे येत आहेत का ? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.

प्रशांत कोरटकर याला जरी अंतरिम जामीन मंजूर झाला असला तरी याच्यासोबत केशव वैद्य नामक व्यक्ती ज्याने मराठी मावळे यांच्या बद्दल अपशब्द काढून इंद्रजीत सावंत यांना घरात जाऊन मारण्याची, धमकी दिली. तो सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी आहे, त्याला सुद्धा अजून अटक केलेली नाही. या सर्वाचा जाब आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारणार आणि आम्ही त्या आंदोलनावर ठाम आहोत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

काळे झेंडे दाखवणार?

पोलीस प्रशासनाने कितीही दबाव वापरला तरी, झालेल्या प्रकरणाबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांना जाब विचारणारच. प्रसंगी कोरटकरला अटक न करण्याची भूमिका घेतली असेल तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात इंडिया आघाडीकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT