Eknath Shinde : भाजपच्या खेळीला शिंदेंचं 'जशास तसं' उत्तर; 11 मंत्र्यांना केलं 23 जिल्ह्यांचा कारभारी? आता अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष

Shivsena News : महिनाभरापूर्वी म्हणजे 5 फेब्रुवारीला भाजपने मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री असलेल्या 17 जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक करीत खेळी केली होती.
Devendra Fadnavis, Eknath shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath shinde, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर महायुतीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. 5 डिसेंबरला सत्तास्थापन केल्यानंतर महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही मित्रपक्षाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपानंतर पालकमंत्रिपद जाहीर करण्यात आले. त्यानंतर महिनाभरापूर्वी म्हणजे 5 फेब्रुवारीला भाजपने मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री असलेल्या 17 जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक करीत खेळी केली होती. त्या घोषणेला महिना होत असतानाच आता एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांकडे मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या 23 जिल्ह्यांचे संपर्क मंत्रिपद त्यांच्या 11 मंत्र्यांकडे सोपवत 'जशास तसे' उत्तर दिले.

जानेवारीमध्ये पालकमंत्र्यांची घोषणा झाली होती. त्यानंतर लगेचच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भाजपने (Bjp) संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली. शिवसेना नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ पालकमंत्री असलेल्या 17 जिल्ह्यांसाठीच भाजपनं संपर्क मंत्री जाहीर केले. भाजप मित्रपक्षांवर कुरघोडी करुन जिल्ह्यांमध्ये आपली समांतर यंत्रणा तयार ठेवली होती. भाजपने केलेल्या या खेळीला आता शिंदेंनी त्याच पद्धतीने डाव टाकत उत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis, Eknath shinde, Ajit Pawar
Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटेंची कोपरखळी....तर माझेही फ्लेक्स लावा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपच्या आक्रमक राजकारणाला त्यांच्याच पद्धतीने जशास तसे उत्तर देताना शिवसेनेच्या (Shivsena) 11 मंत्र्यांकडे एकूण 23 जिल्ह्यांची जबाबदारी दिली. या 23 जिल्ह्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री आहेत. मंत्री उदय सामंत, संजय राठोड यांच्याकडे प्रत्येकी तीन जिल्ह्यांचे संपर्क मंत्रिपद आहे. तर दादा भुसे, योगेश गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, शंभूराज पाटील, आशिष जयस्वाल, प्रकाश आबिटकर या 8 मंत्र्यांकडे प्रत्येकी 2 जिल्हे देण्यात आले आहेत. योगेश कदम यांच्याकडे 1 जिल्हा देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis, Eknath shinde, Ajit Pawar
Hasan Mushrif : मुश्रीफांवरील महायुतीच्या नेत्यांचा कुटील डाव यशस्वी; आधी मित्राने, तर आता सहकाऱ्यांनी केला गेम

महिनाभरातच केली संपर्क मंत्र्यांची घोषणा

भाजपने 5 फेब्रुवारीला संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली. त्या घोषणेला महिना होत असताना आता शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांकडे मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांचं संपर्क मंत्रिपद दिले आहे. त्यामुळे शिंदे भाजपला त्यांच्याच रणनीतीनं प्रत्युत्तर देत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. हे करताना शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे, बीडचे पालकमंत्रिपद आहे त्याठिकाणी शिंदेंनी पुण्याचे संपर्क मंत्रिपद उदय सामंत यांच्याकडे दिले आहेत तर बीडचं संपर्क मंत्रिपद संजय शिरसाट यांच्याकडे दिले आहे.

Devendra Fadnavis, Eknath shinde, Ajit Pawar
MLC Election : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक; फोडाफोडी, घोडेबाजार टाळण्यासाठी महायुतीचा प्लॅन तयार? महाविकास आघाडीला कितपत संधी?

अजितदादांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष ?

राज्यातील महायुती सरकरमधील भाजप व शिवसेनेने संपर्क मंत्र्यांची नेमणूक करीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप संपर्क मंत्र्यांची नेमणूक केलीली नाही. त्यामुळे येत्या काळात अजितदादा काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis, Eknath shinde, Ajit Pawar
Shivsena (UBT) : ठाकरे गटाला कोकणात आणखी एक धक्का? नगराध्यक्षांविरोधात ‘अविश्वास’, शिंदे शिवसेना आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com