Kolhapur News : गेल्या निवडणुकीत भरलेले ताट मी दुसऱ्याच्या समोर ठेवले. त्यांना आमदार केले. पण त्यांनीच गद्दारी केली. म्हणूनच शरद पवार यांनी मला तुमच्या सारख्या गद्दाराला गाडायला मला चंदगड विधानसभा मतदारसंघात आणले आहे, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी राजेश पाटील यांना सडेतोड उत्तर दिले.
राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. डॉ. बाभुळकर म्हणाल्या, 'चंदगड विधानसभा मतदारसंघात दादागिरी केली तर ताईगिरी काय असते हे मी दाखवून देईन? अशा शब्दात त्यांनी विरोधक उमेदवारांना ठणकावले.
शरद पवार (Sharad Pawar) आणि बाबासाहेब कुपेकर यांची मैत्री अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कुपेकर यांनी शरद पवार यांना साथ दिली. माझ्या अस्थी चंदगडच्या पाण्यात विसर्जन कर म्हणून बाबांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली होती. इथल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबात बाबासाहेब कुपेकर आहेत.'
गेल्या काही दिवसात शरद पवार यांची साथ अनेकांनी सोडली. पण मी तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाही, काही काळजी करू नका. राज्यात अलिकडे 'बटेंगे तो कंटेंगे' म्हणत आहेत, पण मी सांगते 'जुडेंगे तो जितेंगे'. दिल्लीसमोर लोटांगण घालणाऱ्या या सरकारला महाराष्ट्र हद्दपार करा. अहंकारी लोकांना मातीत घातल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
2019 साली भरलेलं ताट आम्ही दुसऱ्याच्या हातात दिलं. आम्ही प्रत्येकजण राबलो पण त्यांनी एक वर्षाच्या आत गुण दाखवायला सुरुवात केली. विकासाच्या नावाखाली शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत गेले 1600 कोटी रुपयांचा डंका पिटला जातोय. पण त्यांनी विकास केवळ कंत्राटदार यांचा केला आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनता निष्ठावंत आहे ते नक्कीच निवडून देतील, असा विश्वास डॉ. बाभूळकर यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.