Krishna River Pollution arkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Krishna River Pollution : सांगलीत प्रदूषण महामंडळाची धडक मोहीम, 29 उद्योगांना दणका; मिरज, कुपवाड महापालिकेला कोटींचा दंड

Pollution Control Board Action : सांगली जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या कृष्णा, वारणा नद्यांच्या प्रदूषणात अद्याप कमी आलेली नाही. यामुळे नदीत मासे मृत होण्याबरोबरच आता तीन मगरींचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते, असा सवाल उपस्थित होत होता.

Aslam Shanedivan

Sangli News : कृष्णा, वारणा नद्यांच्या प्रदूषणप्रकरणी लोकांच्यामधील संताप वाढत असून आता संतापाचे रूपांतर जनरेट्यात झालं आहे. यामुळेच येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाला आता जाग आली असून मंडळाने आक्रमक भूमिका घेत नद्यांच्या प्रदूषणप्रकरणी 29 उद्योगांना दणका दिला आहे. यापैकी दोन उद्योगांना कुलूप लागले असून मिरज, कुपवाड महापालिकेला कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. पण अद्याप प्रदूषणाचे ‘उद्योग’ थांबले नसून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुढचे पाऊल काय असणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कृष्णा, वारणा नद्यांमध्ये प्रदूषण वाढत असून यामुळे मासे मृत होत आहेत. दरम्यान नदीतील प्रदुषण वाढल्याने गेल्या दोन महिन्यांत तीन मगरींचा मृत्यू झाला आहे. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उठले होते. तर फक्त अहवाल करणे, तो प्रादेशिक कार्यालयाला पाठवणे, नोटीस बजावणे इतकेच काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहे का? असेही सवाल उपस्थित केले गेले होते. तर मंडळाने कारवाईत थोडी आक्रमकता आणावी, असे जनता दलाचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण माणगावे यांनी खडसावले होते. तर माहिती अधिकारात विचारणा मंडळाने काय कारवाई केली याची माहिती मागितली होती. याच माहितीत प्रदूषण महामंडळाची धडक मोहीम समोर आली असून 29 उद्योगांना दणका दिल्याचे समोर आले आहे.

9 उद्योगांना कारणे दाखवा

प्रदूषण नियंत्रण महामंडळाने 9 उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याचे अद्याप उत्तर आलेले नाही. पण उत्तर प्राप्त होताच पुढील कारवाई होणार आहे. 8 उद्योगांना प्रस्तावित तर 9 उद्योगांना अंतरिम आदेश देण्यात आला आहे. दरम्यान कृष्णा, वारणा नद्यांच्या प्रदूषणप्रकरणी प्रथमेश इंडस्ट्रीज, सुदर्शन ॲल्युमिनियम या दोन उद्योगांना बंदीचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशात जोपर्यंत सांडपाणी प्रक्रिया युनिट बसवले जात नाही तोवर ते उद्योग बंद राहणार आहेत

नगरपालिका, महापालिका रडावर

नद्यांच्या प्रदूषणप्रकरणी फक्त खासगीच उद्योगांना दणका प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिला नसून यात सांगली, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्याल देखाल आहे. महामंडळाने या महाविद्यालयांना प्रत्येकी 4 कोटी 32 लाख रुपयांचा दंड केला आहे. आष्टा, इस्लामपूर नगरपालिकांना प्रत्येकी 2 कोटी 40 लाख आणि सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला 33 कोटींचा दंड करण्यात आला आहे.

तसेच श्री दत्त इंडिया कारखान्याला 42 लाख 30 हजार, तर स्वप्नपूर्ती आसवनीला 3 लाख 60 हजार रुपये दंड लावण्यात आला आहे. तर गेल्या सहा महिन्यांत कृष्णा नदी प्रदूषण, भूजल प्रदूषण, वायू प्रदूषण, आदी मुद्यांवरून राजारामबापू कारखाना, विश्वासराव नाईक कारखाना, सांगली व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोविंद कोल्ड स्टोअरेज, महांकाली एंटरप्राईजेस, उषःकाल अभिनव हॉस्पिटल, विजय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

...अन्यथा, कारवाई अटळ

नदी प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ गंभीर असून जिथे गंभीर परस्थिती असते तेथे कारवाई केली जात आहे. कारवाईची तीव्रता आणखी वाढवली असून अग्रणी फूड्स, गजानन सर्व्हिस सेंटर, सह्याद्री स्टार्च, सांगली महापालिका, एसजीझेड अॅन्‍ड एसजीए शुगर, शिगांव ग्रामपंचायत, सोनू वॉशिंग सेंटर यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे.

तर क्लाऊरस बायो एनर्जी, गजानन सर्व्हिस सेंटर, शासकीय रुग्णालये, राजारामबापू कारखाना, उदगिरी शुगर्स, सह्याद्री स्टार्च, श्रीनिवास मिल्क, न्यूट्रीमॅक्स ॲग्री एक्झीम यांना अंतरिम आदेश बजावण्यात आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगलीचे उपप्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी उद्योग बंद करण्याची आमची भूमिका नाही, त्यांना सांडपाणी प्रक्रिया उभी करावी. अन्यथा, कारवाई अटळ असल्याचा इशाराही दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT