Samadhan Autade-Pranita Bhalke-sunanda autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhalke-Autade Politic's : भालके, आवताडेंची भाजप प्रवेशाची चर्चा; आमदार समाधान आवताडेंच्या उत्तराने वाढविला आणखी सस्पेन्स!

Samadhan Autade Statement : पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत विजयानंतर नगराध्यक्षा प्रणिता भालके व सुनंदा आवताडे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना आमदार समाधान आवताडे यांच्या विधानामुळे अधिकच हवा मिळाली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 January : पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवारांनी बाजी मारत भाजप उमेदवाराला चीतपट केले होते. त्यानंतर पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे ह्या सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याबाबत आमदार समाधान आवताडे यांनी भालके-आवताडे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरामुळे त्याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

पंढरपूर (Pandharpur) आणि मंगळवेढ्याचे नगराध्यक्ष सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याबाबत आमदार आवताडे म्हणाले, राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून एकत्र आल्याशिवाय शहराचा आणि तालुक्याचा विकास होणे अशक्य असतं. मी मोठा की तुम्ही मोठा, असं करण्यापेक्षा ते जर सत्ताधारी पक्षात आले तर त्यांचं आम्ही स्वागतच करणार आहोत.

ते कुठेही आले तरी त्यांचे स्वागतच आहे. (हे सांगत असताना आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी भाजपत भालके आणि आवताडे यांचे स्वागतच आहे, असे शेवटपर्यंत म्हटलंच नाही. ते कुठंही आले तरी त्यांचे स्वागतच करणार आहे, असं म्हटलं आहे.)

ते म्हणाले, पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भगीरथ भालके हे भावनिक आणि जातीयवादाचा नॅरेटिव्ह पसविण्यात यशस्वी झाले. प्रत्येक समाजात जाऊन वेगवेगळ्या गोष्टी सांगणं, असं काम त्यांनी केलं आहे. जाती आणि समाजात तेढ निर्माण करून ते मतं मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांचा नॅरेटिव्ह रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असं आम्हाला वाटलं होतं. पण, निकालानंतर लक्षात आलं की, तो थांबविण्यात आम्हाला अपयश आलं, हे नक्की आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेवटच्या सभेत बोलताना विरोधी उमेदवार निवडून आले तर निधी कसा आणणार, असा प्रश्न केला होता. तो प्रश्रन आजही कायम आहे. आम्ही आणलेल्या निधीमध्येसुद्धा ढवळाढवळ करण्याचे काम सुरू आहे.

पण निवडणुकीच्या प्रचारात आम्ही जर काही बोललो असलो तर जास्तीत जास्त निधी आणून शहराचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पालकमंत्र्यांच्या त्या विधानाचा तोटा झाली की फयदा हे आता सांगणे कठीण आहे. पण निवडणुकीच्या काळात आणि आताही आम्हाला तसं वाटत नाही, असा दावाही आमदार आवताडे यांनी केला.

लोकशाहीत निवडणुकीला उभं राहण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र आहे. पहिल्यापासून मी आव्हान स्वीकारतच आलो आहे आणि अशा आव्हानांना मी उत्तरंही दिली आहेत. अशी आव्हान येतच असतात, असे उत्तर आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या दावेदारीच्या चर्चेवर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT