NCP Vs BJP : भाजपने राष्ट्रवादीचा गेम केला; मतदानाला अवघे तीन दिवस उरले असतानाच उमेदवार पळवला!

Solapur Corporation Election 2026 : सोलापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला असताना भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का देत महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र केला आहे.
NCP Candidate Join BJP
NCP Candidate Join BJPSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 January : सोलापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. सभा, रॅली, पदयात्रा आणि आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उठवला आहे. राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्षांमध्येच लढत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे त्यांच्यात खऱ्या अर्थाने तीव्र चुरस दिसून येत आहे. महायुतीमधील भाजपने मतदानाला तीन दिवस शिल्लक राहिले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे.

सोलापूरच्या (Solapur) महापालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. या युतीने काही प्रभागात भारतीय जनता पक्षापुढे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सोलापुरात महायुतीमध्ये तीव्र संघर्ष दिसून येत आहे. एकमेकांवर टोकाची टीका होताना दिसत आहे. विशेषतः शिवसेना आणि भाजप एकमेकांवर तुटून पडत आहेत.

सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) चांगलाच जोर लावला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व इतर नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीनेही वातावरण निर्मिती केलेली आहे. पण, प्रचार शिगेला पोचलेला असतानाच मित्रपक्ष भाजपनेच राष्ट्रवादी काँग्रेसचा घात केला आहे.

NCP Candidate Join BJP
Pragya Satav : प्रज्ञा सातवांनी भाजपत प्रवेश का केला? : हर्षवर्धन सपकाळांनी नेमकं कारण सांगितलं

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या आक्रमक रणनितीचा फटका मित्रपक्षालाच बसताना दिसून येत आहे. सुरुवातीला शिवसेना नामोहरम करताना निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने राष्ट्रवादीचा गेम केला असून गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रचार करणारा राष्ट्रवादीचा उमेदवाराच गळाला लावला आहे.

NCP Candidate Join BJP
Pankaja Munde : सकाळी सासऱ्यांचा अंत्यविधी, दुपारी अश्रूंना रोखत थेट नाशिकच्या सभेत ! पंकजा मुंडेंची पक्षनिष्ठा पाहून गिरीश महाजन भारावले

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तुषार जक्का यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये आमदार कोठे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरल्याची माहिती आहे. निवडणुकीला अवघे तीन दिवस उरलेले असताना भाजपने उमेदवार पळविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com