Abhijeet Patil : पवारांच्या आमदाराने मनातलं बोलून दाखवलं; ‘मला पण सरकारमध्ये जावं वाटतंय....’

Pandharpur Politic's : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीदरम्यान आमदार अभिजीत पाटील यांनी केलेल्या “मला सरकारमध्ये जावं वाटतंय” या विधानामुळे सोलापूरच्या ग्रामीण राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Abhijeet Patil
Abhijeet PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 January : राज्यात 29 महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला असताना ग्रामीण भागात जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. ग्रामीण राजकारणात आपले वर्चस्व राखून असलेल्या पक्षांनी आतापासून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांनी ‘मला पण सरकारमध्ये जावं वाटतंय,’ असं विधान केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात गटनिहाय बैठकांचा धडका लावला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांशी ते संवाद साधत आहेत. निवडणुकीत तिकिट देण्यासंदर्भातही चर्चा केली जात आहे. एकूणच आमदार पाटील यांनी झेडपी निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे.

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील वाखरी येथे अभिजीत पाटील हे इच्छुकांशी संवाद साधत होते. त्यावेळी इच्छुकांनी तुमच्या मनात नेमकं काय आहे, असा सवाल केला. त्या वेळी आमदार पाटील यांनी माझ्या मनात काय आहे, लक्षात घ्या. मला पण सरकारमध्ये जावं वाटतंय. सरकार निधी देत नाही, मनात कळतंय. पण आपल्या मनात असून काय होतंय का, असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला.

मी सगळ्या इच्छुकांना सांगतोय, तुम्ही सगळेजण एकमेकांबद्दल काहीच बोलू नका. त्याचं कारण असं आहे की, तुम्हा सात ते आठ इच्छुकांमधून एकाला तिकिट मिळणार आहे आणि राहिलेली सहा ते सात तुमचा काटा काढणार आहेत. त्यामुळे कोणी कुणाबद्दल काही बोलू नका.

Abhijeet Patil
BMC Election : मोदी-शाह-योगी मुंबईकडे फिरकलेही नाहीत; उत्तर भारतीय नेते सायलेंट : CM फडणवीसांची रिस्क की स्ट्रॅटेजी?

आपण तर स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्वेनुसार उमेदवारी दिली जाईल. तो सर्व्हे एका गटापुरता नसतो. तुम्ही एकमेकांचा विरोधक नाही तर स्पर्धक आहात. तुमची तिकिट मिळवायची स्पर्धा आहे. तुम्ही इच्छुक जास्त झालात म्हणून ही चर्चा केली जात आहे. तालुक्यात जेवढे इच्छुक नाहीत, तेवढे इच्छुक एकाचा गटात आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Abhijeet Patil
Kolhapur Election 2026: ...तर तिसऱ्या आघाडीचा डाव फसणार, मविआचाही 'करेक्ट कार्यक्रम'? कोल्हापूरच्या राजकारणात 'ही' असणार आव्हानं?

चार महिने कारखाना चालवायचा अन्‌ बारा महिने पगार द्यायचा

कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार अभिजीत पाटील यांनी भाष्य केले. कारखाने पंधरा दिवसांनंतर बंद होतील. जिल्ह्यात फेब्रुवारीत एकही कारखाना सुरू राहणार नाही. चार महिने कारखाना चालवायचा आणि बारा महिने पगार द्यावी लागतो, तसेच बारा महिने बॅंकेचे व्याज भरावे लागते. तुम्हाला बोलायला काय मज्जा वाटते का? असा सवाल आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com