Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde : प्रणिती शिंदेंच्या एन्ट्रीमुळे बाजार समितीच्या निवडणुकीत ट्विस्ट; म्हणाल्या, ‘आताच सगळ्या गोष्टी सांगणार नाही’

Solapur Bazar Samiti Election 2025 : एकीकडे उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मातब्बर काँग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार, याची उत्सुकता वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी बाजार समिती निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 15 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, आमदार सुभाष देशमुख यांनीही भाजप कार्यकर्त्यांसाठी मी बाजार समितीची निवडणूक लढवणारच, असे सांगून शड्डू ठोकला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही बाजार समितीच्या निवडणुकीत ‘काँग्रेस पक्षाची वेगळी भूमिका दिसेल’ असे सांगून बाजार समितीची निवडणुकीत ट्विस्ट आणला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) 18 जागांसाठी 27 एप्रिल रोजी मतदान होणार असून 28 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीची सोलापूर जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांना सोबत जाऊन पॅनेल तयार करणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या या पॅनेलकडून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांना सोबत घेतले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमती दिल्याचेही कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत जाहीररित्या सांगितले आहे. माजी आमदार माने यांनी सहकरात मी स्वयंभू आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याबाबत मला कोणालाही विचारावे लागत नाही,’ असे म्हटले होते.

सुरेश हसापुरे यांना ‘काँग्रेस नेत्यांची परवानगी घेतली का,’ असा प्रश्न विचारला. त्यावेळी हसापुरे यांनी स्पष्ट उत्तर न देता गोलमाल उत्तर दिले होते. मात्र माजी आमदार माने आणि हसापुरे यांच्याकडे उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील सोसायटी मतदारसंघातील सर्वाधिक मतदार संख्या आहे. तोसेच, ग्रामपंचाय मतदारसंघातही त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरते.

एकीकडे उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मातब्बर काँग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार, याची उत्सुकता वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी बाजार समिती निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अद्याप वेळ आहे. अजूनही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेले नाहीत. बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची भूमिका या वेळी वेगळी दिसेल. सगळ्या गोष्टी आता सांगणार नाही, असे सांगून खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिकेबाबत उत्सुकता वाढवली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT