Kagal Politics : संजय घाटगेंच्या माध्यमातून समरजितसिंहांना कोणी दाखवला ‘कात्रज’चा घाट?; राजकीय वाटचाल बनली खडतर!

Samarjeetsinh Ghatge Political News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘गुडबुक’मधील असूनही संजयबाबांचा भाजप प्रवेश घडवून समजितसिंहांचा राजकीय कार्यक्रम घडवून आणण्यामागे कोणाचा हात आहे?, याची चर्चा कागलमध्ये आहे. या घडामोडीमुळे समरजितसिंह घाटगेंची राजकीय वाटचाल आणखी खडतर बनण्याची चिन्हे आहेत.
Samarjeetsinh Ghatge
Samarjeetsinh GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 15 April : माजी आमदार संजय घाटगे यांच्या भाजप प्रवेशाने कागलची राजकीय समीकरणे निश्चितपणे बदलली जाणार आहेत. मात्र, संजयबाबांचा भाजपप्रवेश हा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभेतील पराभवानंतर समरजितसिंहांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. तत्पूर्वीच संजय घाटगेंनी कमळ हाती घेत समरजितसिंह यांना ‘कात्रज’चा घाट दाखवला आहे. घाटगेंच्या या खेळीमुळे समरजितसिंहांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘गुडबुक’मधील असूनही संजयबाबांचा भाजप प्रवेश घडवून समजितसिंहांचा राजकीय कार्यक्रम घडवून आणण्यामागे कोणाचा हात आहे?, याची चर्चा कागलमध्ये आहे. या घडामोडीमुळे समरजितसिंह घाटगेंची राजकीय वाटचाल आणखी खडतर बनण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या राजकारणात गटातटाला कमालीचं महत्त्व आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवत स्थानिक आणि सहकाराच्या जोडण्या राजकीय लोकप्रतिनिधींना राजकीय पटलावर फायदेशीर ठरतात. हा आजपर्यंतच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचा इतिहास आहे. लोकप्रतिनिधींच्या सोईस्कर राजकीय भूमिकेमुळे पक्षीय राजकारणात गटातटांचा समावेश झाल्याशिवाय कोल्हापूरचे राजकारण होऊच शकत नाही. याचा प्रत्यय लोकसभा, विधानसभा महापालिका, जिल्हा परिषदपासून गल्लीबोळातील पाणीपुरवठ्याच्या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत युतीमुळे घाटगे यांना अपक्ष लढावे लागले होते. अपक्ष असूनही समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांना त्यावेळी ८८ हजार ३०८ इतकी मते पडली आहेत. त्यानंतरही ते भाजपमध्ये सक्रिय राहिले होते. त्यानंतर विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत समरजित घाटगे यांना १ लाख ३३ हजार इतके मते पडली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात विरोधातील सर्वात जास्त मते पडणारे एकमेव उमेदवार आहेत.

मागील निवडणुकीपेक्षा मंत्री मुश्रीफ हे यंदा केवळ 11000 च्या आसपास मतांनी विजयी झाले आहेत. वास्तविक महायुती म्हणून माजी खासदार संजय मंडलिक, मतदारसंघातील भाजप, आणि माजी आमदार संजय घाटगे, लाडकी बहिण यांची मदत मिळाली असतानाही मुश्रीफ यांना कमी मताधिक्य मिळाले. मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा समरजित घाटगे यांना 45 हजार इतकी अधिकची मते मिळाली आहेत.

Samarjeetsinh Ghatge
Subhash Deshmukh : काँग्रेससोबत जाण्याच्या कल्याणशेट्टींच्या निर्णयावर देशमुख संतापले; ‘काँग्रेसशी युती अमान्य, मी कोअर कमिटीत आहे की नाही? मी त्यांचा पालक...’

घाटगे यांचं सहकारात मोठे नाव आहे. शाहू साखर कारखान्यासोबत शाहू दूध, शिक्षण संस्था, बँकिंग क्षेत्रातही योगदान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात राहून सहकारी संस्था सांभाळणे अत्यंत कठीण बनते. त्यावेळी सत्तेसोबत पूरक भूमिका घेऊन राहिल्यास अधिक हिताचे असते, असेही सांगितले जाते. त्यामुळे तेही भाजप प्रवेशाबाबत पूरक भूमिका घेतील, अशी चर्चा आजपर्यंत तरी होती.

माजी आमदार संजय घाटगे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर पुढे समरजित घाटगे यांचे काय? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. मुळात सत्तेत राहून सहकार चांगला टिकवू शकतो, असं आजपर्यंतचे चित्र आहे. मात्र विरोधात राहून सहकार टिकवणे मोठे आव्हान आता समरजित घाटगे यांच्यापुढे आहे. यापूर्वी भाजपात राहून त्यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधी खेचून आणला होता. मात्र, आता विरोधात असल्याने निधी आणण्यासाठी आता त्यांच्यासमोर बऱ्याच अडचणी असणार आहेत.

महाविकास आघाडीतील नेत्यांना सध्या तरी राजकीय भवितव्य दिसत नाही. मागील आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात ते व्यासपीठावर दिसले. पण, पक्षीय आणि पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने त्यांच्या हालचाली मंदावलेल्या आहेत. एकंदरीत चित्र पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान द्यायचं असेल, तर घाटगे यांना भाजप किंवा सत्तेतील इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. पण, हसन मुश्रीफ हे महायुतीमधील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत, त्यामुळे ते राष्ट्रवादीत जातील, याची शक्यता खूप कमी आहे. शिवसेनेत जाण्याचा विचार ते करतील असं वाटत नाही.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर समरजित घाटगे यांची भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेलेल्यांना तूर्तास घरवापसी नाही, असा निर्णय महायुतीच्या वरिष्ठ तीन नेत्यांमध्ये झाल्याने घाटगेंचा पक्षप्रवेश सध्या तरी होणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ऑक्टोंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र अंबरीश घाटगे हे भाजपमधून लढण्याची शक्यता आहे. पुढे एक वर्षाने गोकुळ दूध संघाची निवडणूक आहे.

Samarjeetsinh Ghatge
Bharat Gogawale : भरत गोगावलेंची रायगडावर अमित शाहांसोबत चर्चा; म्हणाले, ‘पालकमंत्रिपदाबाबत मी अमितभाईंशी....’

सध्या अंबरीश घाटगे हे विरोधातील संचालक आहेत. पण, अलीकडच्या काळात त्यांनी सत्तेतील पाटील-मुश्रीफ गटाशी जवळीक साधून कामकाज सुरू केले आहे. शिवाय संजय घाटगे हे आमदार सतेज पाटील यांच्या अधिक जवळचे असल्याने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत घाटगे हे सत्तारूढ गटांसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घाटगे यांना भाजपमध्ये घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील. गोकुळच्या निवडणुकीतही अंबरीश घाटगे यांना महायुतीची साथ द्यावी लागेल, असे सूत्र ठरू शकते. त्यामुळे समरजीत घाटगे यांचा भाजप प्रवेश तूर्तास तरी रोखल्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com