PM Narendra Modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara PM Modi News : पंतप्रधान मोदी साधणार कातकऱ्यांशी संवाद; जन-मन योजनेचा 845 कुटुंबांना लाभ

Satara Collector सातारा जिल्ह्यात नऊ तालुक्यांतील ७१ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ८४५ कातकरी कुटुंबे वास्तव्यास असलेल्या गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News : सातारा जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांच्या प्रधानमंत्री जन-मन योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. जिल्ह्यातील ८४५ कातकरी समाजातील कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत येत्या सोमवारी [ता. १५] पंतप्रधान नरेंद्र मोदी या लाभार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता जनजाती आदिवासी न्याय महाअभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने प्राधान्यक्रमाने घेतला आहे. यासाठी १५ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी Narendra Modi यांच्या हस्ते प्रधानमंत्री जन-मन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे.

या अभियानादरम्यान सातारा जिल्ह्यात Satara District नऊ तालुक्यांतील ७१ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ८४५ कातकरी कुटुंबे वास्तव्यास असलेल्या गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांना आधार कार्ड, शिधापत्रिका, आयुष्यमान भारत, आरोग्य कार्ड, जातीचा दाखला, घरकुल, रस्ते, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सेवा-सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

यासाठी जिल्हा प्रशासन अविरतपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या जिल्ह्यातील ८४५ लाभधारक कुटुंबांशी १५ जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रशासनाच्यावतीने मेढा (ता. जावली) येथील ‘कलश मंगल कार्यालयात’ ऑनलाइन कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. कार्यक्रमासाठी पात्र लाभधारक कुटुंबांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Umesh Bambare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT