Prithviraj Chavan, Udayanraje Bhosle Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chanvan On Udayanraje : पृथ्वीराज चव्हाणांचा उदयनराजेंवर पलटवार, म्हणाले,'सही येते की नाही हे...'

Satara Loksabha Election 2024 : सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाच जिल्ह्यांसाठी एक कृषी विद्यापीठ मंजुर करावे अशी माझी मागणी होती.

हेमंत पवार

Satara News : पाच जिल्ह्यांसाठी एक कृषी विद्यापीठ मंजूर करावे अशी माझी मागणी होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कित्येकवेळा मी त्या फाईलवर सही करा म्हटले. मात्र त्यांना सही करता येत नाही की काय ? मात्र त्यांनी सहीच केली नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली होती. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सही करता येत नाही हे कारण असू शकते का ? सही करता येत की नाही ते महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, असा पलटवार केला.

सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाच जिल्ह्यांसाठी एक कृषी विद्यापीठ मंजुर करावे अशी माझी मागणी होती. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री असताना कित्येकवेळा मी त्यांना फाईलवर सही करा म्हटले होते. त्यांनी जागा कुठे आहे, असे विचारले. जिल्ह्यात शासकीय जागा असताना रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र त्यांनी फाईलवर सही केली नाही. त्यांनी का सही केली नाही हे मला कळत नाही कि त्यांना सही करता येत नाही ? हे काय कळत नाही.

सही केली असती तर साताऱ्याच्या मुलांना पुण्याला व इतर ठिकाणी जावे लागले नसते. ते पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. त्यांनी आयआयटी, आयआयएमचा प्रोजेक्ट आणला असता. पण त्यांनी तसे केले नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली होती. त्यावर चव्हाण म्हणाले, सही येत नाही हे कारण असू शकेल का ? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा जिल्ह्यात सरकारी कृषी कॉलेज व्हावे अशी माझी इच्छा होती. त्यानुसार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांच्या जन्मशताब्दी वर्षात आम्ही शासकीय कृषी महाविद्यालय कऱ्हाडला सुरु केले. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे कॉलेज खासगी होते की सरकारी होते, जागा उपलब्ध होती का ? हा काय विषय ते मला आत्ता आठवत नाही. सरकारी जागा पण द्या आणि मला खासगी कॉलेज द्या, अशी मागणी असेल तर वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केला गेला असेल, असेही त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT