Loksabha Election 2024: 'इन्कमिंग'वाल्यांना 'अच्छे दिन'! सात उमेदवारांना लागली लोकसभेची 'लॉटरी'

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीसाठी 'अभी नही तो कभी नही' असे म्हणत इच्छुकांनी आता दंड थोपटले आहेत.
Loksabha Election 2024 Survey
Loksabha Election 2024 SurveySarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी गेल्या वर्षी दीड वर्षापासून जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यानुसार आपला मतदारसंघ सुरक्षित करताना तसा 'शब्द' घेत इन्कमिंग-आउटगोइंग केलं, तर दुसरीकडे काहीजण मतदारसंघातल्या नाट्यमय घडामोडी आणि जाहीर होणाऱ्या उमेदवारांकडे डोळे लावून बसले होते.

पण उमेदवारांची लिस्ट फायनल होत असतानाच आता तिकीट न मिळालेल्या इच्छुकांनी दुसऱ्या पक्षात उड्या मारण्यास सुरुवात केली आहे, पण यात निष्ठावंतांना नारळ तर आयारामांची चांदीच झाल्याचे दिसून येत आहे.

Loksabha Election 2024 Survey
Vishal Patil News : जयंतरावांना विशालदादांनी करून दिली वसंतदादांच्या 'त्या' विधानांची आठवण

लोकसभा निवडणुकीसाठी 'अभी नही तो कभी नही' असे म्हणत इच्छुकांनी आता दंड थोपटले आहेत. यात लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या माढा, नगर दक्षिण, शिरूर, बीड, जळगाव, रामटेक, धाराशिव लोकसभा मतदारसंघांसाठी पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली झाल्यानंतर अखेर या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

यात विद्यमान पक्षातील निष्ठावंतांना संधी नाकारतानाच ऐनवेळी प्रवेश केलेल्या आयारामांच्या गळ्यात थेट लोकसभेच्या उमेदवारीची माळ पडली. किंबहुना इतकी वर्षे कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या नेत्यांचा उमेदवारीसाठी चक्क पायघड्या घालत अन् वाजतगाजत पक्षप्रवेशही करवून घेतला.

शिरूरमध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना यंदाच्या निवडणुकीत पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) इरेला पेटले असून, त्यांनी मोठा डाव टाकला. त्यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचाच पक्षप्रवेश करून त्यांना उमेदवारीही जाहीर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीडमध्ये अजित पवारांना धक्का...

बीडमध्ये भाजपने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आली. तिथे शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचं नाव सुरुवातीपासून चर्चेत होते.पण अचानक शरद पवारांनी पत्ते बदलत अजित पवारांचा विश्वासू नेताच गळाला लावत थेट बजरंग सोनवणेंनाच आपल्याकडे आणत त्यांना उमेदवारीही जाहीर केली.

जळगावात भाजपला भगदाड...

भाजपने यंदाच्या निवडणुकीत विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचं तिकीट कापले. यानंतर नाराज पाटलांनी ठाकरे गटाची वाट धरली. उन्मेष पाटलांनी त्यांचा निकटवर्तीय असलेल्या करण पवारांसह ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर पाटलांना तिकीट मिळणार, अशी चर्चा असतानाच ठाकरेंनी करण पवारांना जळगावातून उमेदवारी जाहीरही केली. भाजपच्या स्मिता वाघ आणि त्यांच्यात थेट लढत होणार आहे.

Loksabha Election 2024 Survey
Lok sabha Election 2024 : फडणवीसांची आडम मास्तरांवर टीका; ‘त्यांनी कोणलाही पाठिंबा दिला तरी कामगार मोदींनाच मते देतील'

धाराशिवमध्ये अर्चना पाटलांना लॉटरी...

धाराशिव हा मतदारसंघ महायुतीसाठी डोकेदुखी ठरला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड आग्रही असलेला हा मतदारसंघ जागावाटपात अजित पवार गटाला मिळाला. पण ठाकरेंचे शिलेदार राहिलेल्या ओमराजे निंबाळकरांविरोधात उमेदवारीच्या शर्यतीत अनेक नावं आघाडीवर होती.

नेमकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याविषयी चर्चा होत असतानाच भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्यांना उमेदवारीही जाहीर झाली.

अजित पवारांनी साम दाम दंड भेद अशी सगळी शक्ती वापरूनही आमदार नीलेश लंके यांनी आपल्या आमदारकीवर पाणी सोडत शरद पवारांसोबत सोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनीही लंकेंना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करत भाजपच्या सुजय विखे यांच्याविरोधात मैदानात उतरवले आहे.

Loksabha Election 2024 Survey
Maval Lok Sabha Constituency : रावणाची उपमा देत श्रीरंग बारणेंवर निशाणा; संजोग वाघेरे नेमके काय म्हणाले?

माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची रिस्क

माढ्यात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर मोहिते गट चांगलाच नाराज झाला. उमेदवार बदला अशी मागणी करूनही भाजपने आपला निर्णय कायम ठेवला. त्याचमुळे अखेर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर धैर्यशील मोहिते (Dhairyashil Mohite Patil) माढा लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

रामटेकमध्ये काँग्रेसचा आमदार बनला शिंदेंचा उमेदवार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करून त्यांना रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत काँग्रेसच्या श्याम बर्वे यांच्याशी असणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Loksabha Election 2024 Survey
Dindori Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या भारती पवारांच्या प्रचारापासून अलिप्त?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com