Devendra Fadnavis -prithviraj chavan-Ajit pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politic's : पृथ्वीराजबाबांचं मराठी पंतप्रधानाबाबत भाष्य; तर राष्ट्रवादी नेत्याचा अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा

Ajit Pawar Chief Minister Post News : पृथ्वीराज चव्हाण यांच्या एपस्टाईन फाईल्स संदर्भातील विधानानंतर महाराष्ट्रात मोठी चर्चा रंगली असून अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाबाबतही नवी चर्चा सुरू झाली आहे.

Vijaykumar Dudhale
  1. अमोल मिटकरी यांनी महायुती सरकारच्या एक वर्षपूर्तीच्या शुभेच्छांमध्ये अजित पवार हे भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सूचक विधान करून राजकीय चर्चांना चालना दिली.

  2. मिटकरी यांनी अजित पवारांच्या कामगिरीचे जोरदार कौतुक करत 'अजितपर्व लवकरच' असा उल्लेख केला, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी मराठी पंतप्रधान होण्याची शक्यता व्यक्त केली होती.

  3. मिटकरी म्हणाले की, महायुतीत अजित पवार कधीही नाराज झाले नाहीत; फडणवीसांचे नेतृत्व मान्य असून राष्ट्रवादीची भूमिका अजित पवारांच्या नेतृत्वाभोवती ठामपणे उभी आहे.

Akola, 05 December : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील एपस्टाईन फाईल्स संदर्भात भाष्य करताना लवकरच मराठी माणूस पंतप्रधान झालेला दिसेल, असे म्हटले होते. तोच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी महायुती सरकारच्या एक वर्षाच्या पूर्तीनिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा मोठे भाष्य केले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या पंतप्रधानपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, महायुतीमध्ये गेल्या एक वर्षापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऊर्जावान मंत्री म्हणून काम पाहत आहेत. लाडकी बहीण योजना ही संकल्पना अजित पवारांची होती आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी केली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींचा महायुती सरकारला भक्कम आशीर्वाद मिळाला. काम करणारे गतीशील नेतृत्व आहे. त्यांच्याकडे रुसवे फुगवे नसतात. सरकारवर नाराजी नसते.

आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर प्रचंड आरोप होत आहेत, तरीही विचलित न होता जनतेत शांततेत काम करीत असतात. त्यातून महायुती घट्ट करण्याचे काम ते करत असतात. त्यामुळे त्या अनुंषगाने मी त्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमोल मिटकरी यांनी आपल्या शुभेच्छांंमध्ये म्हटले आहे की,

महाराष्ट्राच्या विकासाचा,

आमचा निश्चयी वादा

'महायुती'चे 'पॉवर हाऊस'

आमचे अजितदादा...

यशवंतरावांच्या स्वप्नांना

महायुतीने दिली गती

'राष्ट्रवादी' विचारांनी

समृद्ध मराठी माती....

‘देवेंद्रपर्व’ वर्षपुर्तीवर

महाराष्ट्राला आहे गर्व

चौफेर विकासाचं

लवकरच अजितपर्व ....

मिटकर यांच्या दाव्याने मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे

याबाबत मिटकरी म्हणाले, रुसवे फुगवे कोणाचे आहेत, हा समझनेंवाला इशारा काफी होता है. पक्षांतराबाबत अजित पवार यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आम्ही मान्यच केले आहे. शिवाय आम्ही सेकंड उपमुख्यमंत्री आहोत, हे सांगून टाकले आहे, त्यामुळे आम्ही कार्तिकी वारीच्या विठ्ठलाच्या महापुजेचा मानही आम्ही दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे. त्यांचा तो अधिकार आहे.

गेल्या वर्षभरात अजित पवार एकदाही नाराज झालेले नाहीत. पार्थ पवारांच्या बाबत एवढे आरोप होऊनही अजित पवार यांनी कधीही नाराजी व्यक्त केलेले नाही. वर्षभरात आम्ही महायुतीमध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या प्रगतिपथाचा रथ चौफेर पुढे जात आहे. त्याला आम्हाला बिनशर्त पाठिंबा आहे, असे मिटकरी म्हणाले.

नगरपालिका निवडणुका झाला, आगामी निवडणुका आम्ही अजित पर्वासाठी लढत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून अजित पवारांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावं, अशी भूमिका मांडली आहे. दुसऱ्या वर्षपूर्तीला अजित पवार हे मुख्यमंत्री होतील का हे वेळच सांगेल. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी पंतप्रधानाबद्दल केलेले विधान हे उगीच केलेले नव्हते, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.

1. अमोल मिटकरी यांनी नेमके काय विधान केले?
→ “लवकरच ‘अजितपर्व’ येईल,” असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाला इशारा दिला.

2. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याशी याचा संबंध काय?
→ चव्हाण म्हणाले होते की मराठी पंतप्रधान दिसेल, त्यावरून फडणवीसांच्या भविष्यावर चर्चा पेटली.

3. मिटकरी अजित पवारांविषयी कौतुक का करत आहेत?
→ त्यांच्या ऊर्जावान कामकाजामुळे, लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे आणि महायुतीतील स्थिरतेमुळे.

4. अजित पवार खरोखर मुख्यमंत्री होतील का?
→ मिटकरी म्हणतात, “वेळच सांगेल”, पण राष्ट्रवादी (अजित गट) त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT