Shivsena Vs NCP : शपथविधी आधीच शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वाद, अमोल मिटकरी म्हणाले, 'गुलाबराव जुला*** होऊ नका'

Shivsena Vs NCP Amol mitkari Gulabrao Patil : शिंदेंच्या शिवसेनेत बोलणार जास्त नाहीत. आधी रामदास कदम बोलून गेले आता गुलाबराव पाटील बोलून गेले. मला कळत नाही का अचनाक हे उफाळून येतय, असे मिटकरी म्हणाले.

Amol mitkari Gulabrao Patil  Ajit Pawar Sharad Pawar
Amol mitkari Gulabrao Patil Ajit Pawar Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs NCP : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. 230 पेक्षा अधिक जागा जिंकण्याऱ्या महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र, या शपथविधी आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजितदादा आमच्यात नसते तर आम्हाला 100 जागा मिळाल्या असत्या असा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. तर, भाजप 132 जागांवर विजयी झाला आहे.

गुलाबराव पाटील यांच्या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी कडवट शब्दात उत्तर दिले. मिटकरी म्हणाले, गुलाबरावांनी गुलाबासारखंर राहावं जुलाबराव होऊ नका. अजित पवार यांनी घेतलेली मेहनत आणि तीनही पक्षांच्या नेत्यांनी घेतलेली मेहनत विसरता येत नाही.


Amol mitkari Gulabrao Patil  Ajit Pawar Sharad Pawar
Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंच्या उत्तरानं सगळ्यांनाच कोड्यात टाकलं...

शिंदेंच्या शिवसेनेत बोलणार जास्त नाहीत. आधी रामदास कदम बोलून गेले आता गुलाबराव पाटील बोलून गेले. मला कळत नाही का अचनाक हे उफाळून येतय, असे मिटकरी म्हणाले.

मला कळत नाही अजितदादांना का टार्गेट केलं जातय. गुलाबराव पाटलांनी गुलाबासारखं राहावं आता तुमचा सुगंध कमी झालेला दिसतोय. मंत्रि‍पदी वर्णी लागते की नाही याबद्दल शंका आहे, असा टोला देखील मिटकरींनी लगावला.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटील म्हणाले, अजित पवार आमच्यात आले नसते तर आम्हाला अधिक जागा मिळाल्या असत्या. तसेच आम्ही 90 ते 100 जागांवर विजयी देखील झालो असतो. अजित पवार आमच्यात आल्यानंतर यांना का घेतले असे एकनाथ शिंदे म्हणाले नाहीत, असा आहे आमचा नेता.


Amol mitkari Gulabrao Patil  Ajit Pawar Sharad Pawar
Uddhav Thackeray and Eknath Shinde : 'जसं उद्धव ठाकरे सोबत झालं तेच एकनाथ शिंदे सोबतही....' ; सत्ता स्थापनेवरून माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com