Rajendra Patil Yadravkar-Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : राजू शेट्टींनी तोफेचे तोंड यड्रावकरांकडे वळविले; म्हणाले ‘स्वतःचे अपयश लपविण्यासाठी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले’

Nagpur-Ratnagiri Highway : नागपूर -रत्नागिरी महामार्गातील अंकली ते चोकाक मार्गातील बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा चौपट मोबदला द्यावा, अशी मागणी करत गेल्या दीड वर्षांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 17 March : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गातील उर्वरित भूसंपादनासाठी चौपट मोबदला द्यावा, अशी मागणी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांची आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या दीड वर्षापासून या प्रश्नासंदर्भात आंदोलन सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 800 एकर पैकी 760 एकर जमिनीचे संपादन झाले असून उर्वरित 40 एकरच्या संपादनासाठी शेतकरी तटस्थ आहेत. त्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हे आंदोलन राजकीय असल्याची टीका केली होती. त्यामुळे राजू शेट्टी हे संतप्त झाले असून आमदार यड्रावकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

नागपूर -रत्नागिरी महामार्गातील अंकली ते चोकाक मार्गातील बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा चौपट मोबदला द्यावा, अशी मागणी करत गेल्या दीड वर्षांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. तरीही राज्य आणि केंद्र सरकारकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana) या मागणी संदर्भात वेळोवेळी आवाज उठवला जात आहे.

माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याकडून रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून शेट्टी यांना ताब्यात घेतले. त्यावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हे आंदोलन राजकीय असल्याची टीका केली होती.

त्यावर शेट्टी यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर निशाणा साधत यड्रावकर यांनी स्वतःचे अपयश लपविण्यासाठी ११ गावांतील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला असल्याची टीका 'स्वाभिमानी चे नेते राजू शेट्टी यांनी केली.

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपट मोबदल्यात राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी फसवणूक केली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी महापुराचा विचार न करता सुरुवातीस रेखांकन बदलले. पण, नवीन कायद्याप्रमाणे दुप्पट नुकसान भरपाई मिळणार हे लक्षात आल्यावर जैनापूर गावास बायपास करण्यात आलेले रेखांकन पुन्हा बदलून पूर्वीचे कायम करून कोथळी, सांगली शहर, धामणी, समडोळी कतठेपिराण, हिंगणगात, कुंभोज, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, किणी ते खोची या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT