BJP MLA Supports Contractor in Substandard Construction: इचलकरंजी कबनूर चौकातील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम सुरू होते. मात्र निकृष्ट दर्जाचे काम व नियमानुसार होत नसल्याने सागर कोले यांनी तक्रार दाखल केली होती. तरीदेखील ठेकेदाराने काम चालूच ठेवले. आंदोलन केल्यानंतर काम बंद करावे लागले होते.
आमदार राहुल आवाडे यांना ही गोष्ट समजताच त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अभियंता राठी यांना काम सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी कोले यांनी निकृष्ट कामाबाबत तक्रार मांडली मात्र तुमचे क्वालिफिकेशन आहे का? तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? असे विचारून कोले यांनाच दम दिला. त्यामुळे निकृष्ट कामाला आमदारांचा पाठींबा आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
कबनूर देशभक्त रत्नप्पाण्णा कुंभार चौकातील वाहतुकीस अडथळा करणारे विद्युतखांब, ट्रान्सफार्मर व विद्युततारा काढून जमिनीखालून केबल टाकण्याचे काम सुरू होते. पण हे काम निकृष्ट दर्जाचे आहे, असा आरोप करून काम थांबवण्यात आले होते. आमदार राहुल आवाडे यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन तक्रारदारांचा विरोध झुगारत विद्युत वितरण कंपनीस काम सुरू करण्यास सांगितले.
या चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चौकात भूमिगत केबल टाकणे व इतर कामांसाठी 80 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. गुरुवार 27 मार्च रोजी होणाऱ्या ऊरुसापूर्वी हे काम व्हावे, म्हणून महावितरण कंपनीने जमिनीखालून केबल टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र या निकृष्ट कामाची चौकशी करावी व चौकशी करेपर्यंत काम थांबवावे म्हणून काम थांबवण्यात आले होते.
दरम्यान शनिवारी दुपारी या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार आवाडे आले असता त्यांना याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना काम सुरू करण्यास सांगितले. या ठिकाणी तक्रारदार सागर कोले यांनी आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला असता आमदार राहुल आवाडे तक्रारदाराला दमदाटी केली.
तसेच म्हणाले की, कामाला निकृष्ट म्हणायला तुमचे क्वॉलिफिकेशन आहे का?तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? अशी विचारणा करून आमदार आवाडे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना काम तात्काळ सुरू करण्यास सांगितले.
आपली तक्रार ऐकूनच घेतली नाही म्हणून संतप्त झालेले तक्रारदार सागर कोले हे आत्मदहनासाठी पेट्रोल आणण्यासाठी निघून गेले. त्यामुळे चौकात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
काही युवकांनी सागर कोले यांना आत्मदहनापासून परावृत करून आमदार आवाडे यांच्याशी चर्चा घडवून आणली. आमदार आवाडे यांनी तक्रारदार कोले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तक्रारदार कोले यांनी मी कामात अडथळा करणार नाही. पण कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत रीतसर लढा चालूच ठेवणार असे सांगितले.
यानंतर आमदार व कोले यांची बंद खोलीत चर्चा झाली. दरम्यान कॉन्ट्रॅक्टरने जमिनीत पुरलेली केबल पुन्हा काढून त्यावर हाफ राउंड गटर टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे याचा अर्थ काय हे कळू शकले नाही. काम नियमाप्रमाणे होतं तर थांबवलं का? व जर काम नियमाप्रमाणे झाले होते तर पुन्हा पुरलेल्या केबल का काढल्या याचं गूढ मात्र कायम आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.