Kolhapur Political News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माझी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी चर्चा केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी केला होता. त्याला शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. त्यातील काहीजण अजित दादांसोबत गेले. आणि मागे अवशेष ठेवले. ते आता भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहेत. याच्यावर जास्त शरद पवार (Sharad Pawar) प्रकाश टाकू शकतील. मी गडकरींकडे गेलो कधी गेलो ? काय चर्चा झाली याची माहिती शरद पवारांना अधिक असेल, कारण पवार हे नितीन गडकरांचे मित्र आहेत. अशा शब्दांत शेट्टीनी पवारांवर तोफ डागली आहे.
शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या जागा वाटपाचे काय झाले याची चौकशी करणे हे माझं काम नाही. माझं काम चालू आहे. मतदार संघातील पहिला राऊंड भेटीगाठींचा पूर्ण झालेला आहे. महाविकास आघाडीने उमेदवार उभा केला तर तिरंगी लढत होईल नाही केला तर दुरंगी लढत होईल. मात्र असे झाले तर मी लढणारच आहे मतदार माझ्या मागे उभा आहे. असा विश्वास शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावरून बोलताना शेट्टी यांनी, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी मी दोन वेळा चर्चा केली आहे. त्यावरून ते उमेदवार न देण्याच्या मानसिकतेत आहेत असे संकेत मला मिळालेत. शेवटी पक्ष म्हणून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. उमेदवारी दिली तर काय होईल नाही दिली तर काय होईल या गोष्टी मी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. असेही शेट्टी म्हणाले.
स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी तुपकरांनी थेट राजू शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाशी पंगा घेतला होता. यावर शेट्टींनीते पक्षातच असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, रविकांत तुपकर अजून स्वाभिमानीतच आहेत. त्यांनी स्वाभिमानीकडूनच लोकसभा निवडणूक लढवावी, असा आमचा आग्रह आहे.
इलेक्ट्रॉल बॉण्डप्रकरणावर शेट्टींनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, एकीकडे गोवंश हत्याबंदी कायदा करायचा, मॉब लीचिंगद्वारे गोरगरिबांना ठेचून मारणाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करायची. दुसरीकडे मात्र बीफ निर्यात करून पैसा कमवायचा आणि बीफ निर्यात करणाऱ्यांकडून इलेक्ट्रॉन बॉण्ड मिळवायचे. भाजपची कथनी आणि करणीमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रवाद आणि वैचारिक भूमिका संशयास्पद आहे, असा शब्दात शेट्टींनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.