Raju Shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News : विरोधी पक्षात जाल, तेव्हा तुमची काय हालत होईल? ; शेट्टींचा भाजपला खुला इशारा..

Raju Shetti On Rahul Gandhi : "जे आज दगड मारत आहेत ते काचेच्या घरात राहत आहेत.."

सरकारनामा ब्यूरो

Sangali News : केवळ तुम्ही सत्तेत आहात, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर करत असाल, पण आज जे गैरवापर करतात त्यांनाही पुढील काळात विरोधी पक्षात जावं लागणार, त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचाही विचार करा, असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shett) यांनी भाजपला दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर सांगलीत शेट्टींनी प्रतिक्रिया दिली.

राजू शेट्टी म्हणाले की,"सद्यस्थितीत राजकारणामध्ये कशा पद्धतीचा भाषेचा वापर करावा, कशी टीका टिरण्णी करावी, याचं कसलंही ताळतंत्र राहिलेलं नाही. असंसदीय शब्द कसेही सर्रासपणे वापरले जातात, अशी स्थिती असली तरी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून न्यायालयाने ज्या तात्काळतेने शिक्षा सुनावली, ते संशयास्पद वाटत आहे. एकूणच न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्यासारखे असेच सामान्य लोकांना वाटते.

जे आज दगड मारत आहेत ते काचेच्या घरात राहत आहेत :

"खालच्या स्तरावर जाऊन जातीय तेढच निर्माण होत जाईल, वांशिक भेद निर्माण होईल, हिंसा प्रवृत्त होईल, अशीच विधाने सद्या सातत्याने होत आहेत. लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व अशाप्रकारे रद्द करणे, हे योग्य नाही, ते चुकीचेच आहे, असे माझे मत आहे," असे शेट्टी म्हणाले.

"नुसतं राजकारण करणं बाजूला ठेवा. या प्रकाराकडे पाहिल्यावर लोकशाहीवर एक प्रेम करणारा माणूस म्हणून आपल्याला खेद वाटतं. जे आज दुसऱ्यांवरदगड फेकत आहेत, ते लोक काचेच्या घरात राहतात. जर त्यांच्याकडे कोणी दगड मारला तर काचा फुटतात. तुम्ही आज सत्तेत म्हणूनम केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहात, पण आगामी काळात त्यांना विरोधी पक्षात बसावं लागेल, तेव्हा त्यांचं काय होईल , याचा त्यांनी विचार करावा," असा इशारा शेट्टींनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT