Eknath Shinde-Ramraje Naik Nimbalkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramraje Group News : एकनाथ शिंदेंना मोठी लॉटरी; रामराजे गट लढवणार शिवसेनेच्या धनुष्यबाणावर फलटण नगरपालिका?

Phaltan Nagar Parishad Election 2025 : फलटण नगरपालिका निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामा ब्यूरो
  1. फलटण नगरपालिकेची निवडणूक शिंदे गटासह लढण्याचा निर्णय रामराजे नाईक निंबाळकर गटाने घेतल्यामुळे सातारा जिल्ह्यात मोठी राजकीय हालचाल घडली आहे.

  2. विधानसभा पराभवानंतर रामराजे गट एकाकी पडला होता, त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

  3. शिवसेना जिल्हाप्रमुख व इतर नेत्यांनीही या निर्णयाला दुजोरा दिल्याने फलटणमध्ये शिंदे गटाची ताकद अचानक वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Satara, 16 November : नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवसाचा कालावधी उरलेला असताना सातारा जिल्ह्यातून मोठी राजकीय घडामोड समोर येताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून झालेली कोंडी फोडण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांनी नगरपालिका निवडणूक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण नगरपालिकेची निवडणूक राजेगट धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढविणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शिंदे गटाला फलटणमध्ये अनपेक्षितपणे लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले आणि शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांनी रामराजे गट धनुष्यबाणाच्या चिन्हावर फलटण नगरपालिकेची निवडणूक लढविणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नगरपालिका निवडणुकीचे पडघम सध्या जोरजोरात वाजत आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून नगरपालिका जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलेले तिकिट नाकारून ऐनवेळी तुतारीची उमेदवारी घेणारे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) गटाला फलटणमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाचे सचिन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले आहेत.

रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रामराजे गटाची पुरती नाकाबंदी झाली आहे, त्यामुळे रामराजे गटाला प्रबळ मोठ्या राजकीय पक्षाची गरज असताना त्यांना फलटणच्या राजकारणात एकाकी पडावे लागले. रामराजे गटापुढे नोंदणीकृत राज्यस्तरीय आघाडी नसल्यामुळे त्यांना इतर राजकीय पक्षाकडे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जाते

नगरपालिका निवडणुकीत सर्व बाजूंनी कोंडी होत असल्याचे पाहून रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यातही फलटण नगरपालिकेच्या सर्व जागा रामराजे गट हा शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढविणार असल्याची माहिती आहे.

रामराजे गटाचे सोशल मीडिया प्रमुख तथा फलटण बाजार समितीचे संचालक अनिल गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंंदे गटाचे धनुष्यबाण हे चिन्ह स्टेट्‌सला ठेवून त्यावर शंभर टक्के असे लिहिलेली पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, त्यामुळे गायकवाड यांची ती पोस्ट राजे गटाच्या निर्णयाला दुजोरा देणारी ठरत आहे.

1. रामराजे नाईक निंबाळकर गटाने कोणासोबत युती केली आहे?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत.

2. फलटण नगरपालिकेची निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवली जाणार आहे?

शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हावर.

3. रामराजे गटाला युतीची गरज का भासली?

स्थानिक राजकारणात ते एकाकी पडल्याने आणि नोंदणीकृत आघाडी नसल्याने.

4. या निर्णयावर अधिकृत पुष्टी कोणाकडून मिळाली?

शिवसेना जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले आणि नेते चंद्रकांत जाधव यांनी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT