

सातारा नगराध्यक्षपदावर उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे गटांमध्ये तिढा कायम असून, दोन्ही बाजू प्रतिष्ठेचा प्रश्न मानत असल्याने उमेदवारांची अंतिम यादी ठरत नाही.
परळी खोऱ्यात झालेल्या बैठकींसह अनेक चर्चा निष्फळ ठरल्या, कारण प्रभागनिहाय जागावाटप, उमेदवारांचे स्थलांतर व तडजोडींचे मुद्दे एकमताने सुटू शकले नाहीत.
अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस उरले असताना इच्छुकांमध्ये प्रचंड अनिश्चितता असून, काहींना ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज भरण्याचे सूचनात्मक संदेश पोहोचू लागले आहेत.
Satara, 16 November : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असतानाही ‘मनोमिलन पॅटर्न’नुसार नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारी अद्याप अंतिम होऊ शकलेले नाही. नगराध्यक्षपदासाठी सावर्जनिक बांधकामंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोन्ही गट कमालीचे आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही राजेंनी सातारा (Satara) नगराध्यक्ष पदासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असली तरी या विषयावर दोन्ही गटातील नेत्यांनी मौन बाळगले आहे. नगराध्यक्षपदाचा तिढा सुटल्यानंतरच त्यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत. सध्यातरी दोन्ही गटांकडून ‘नगराध्यक्षपद सुटेना, यादी अंतिम होईना’ अशी स्थिती आहे.
नगरपालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवर लढवणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्यात जागा वाटपासह इतर बाबींवर नुकतीच प्रदीर्घ चर्चा झाली.
परळी खोऱ्यातील एका फार्म हाऊसवर मोजक्या शिलेदारांच्या उपस्थितीत दोघांमध्ये बराच काळ नगराध्यक्षपद आणि नगरसेवक उमेदवारांच्या यादीवर खल झाला. पण नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या यादीवर एकमत होत नसल्याने ती बैठकही वायफळ ठरली.
दिवसभराच्या चर्चेनंतर सायंकाळच्या सुमारास संदिग्ध प्रभाग, त्यातील उमेदवार, जागांसह इच्छुकांचे स्थलांतर, स्थानांतर यासह तडजोडीच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा ॲड. दत्ता बनकर, सुनील काटकर, अविनाश कदम, अमोल मोहिते यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत समोर आलेले मुद्दे दोन्ही बाजूंनी आपापल्या नेत्यांसमोर मांडण्यात आले. दोन्ही बाजूंनी दावा करण्यात आल्याने नगराध्यक्षपदच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.
नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी सोमवार (ता. १७ नोव्हेंबर) ही अंतिम मुदत असल्याने इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लागला असून, दोन्ही राजेंच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.
नगराध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत
सातारा नगराध्यक्षपदासाठी उदयनराजे भोसले गटाकडून काका धुमाळ, संग्राम बर्गे, किशोर शिंदे यांची, तर शिवेंद्रसिंहराजे गटाकडून अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. या नावांवर, तसेच २५ पैकी सहा प्रभागांतील जागा, त्याठिकाणच्या लढती आणि परस्परपूरक उमेदवार निश्चितीवर चर्चा रेंगाळत असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी याच अनुषंगाने पुन्हा एकदा बैठक झाली. पण चर्चेतील मुद्द्यांचे घोडे हे नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदाच्या अंतिम निर्णयापर्यंत पोचू शकलेले नाही.
अर्ज भरण्यासाठी काहींना निरोप
दोन्ही गटांकडून इच्छुक असणाऱ्यांपैकी अधिकृत उमेदवारांची यादी अद्यापही तयार झाली नाही. मात्र, वरिष्ठांकडून अर्ज दाखल करण्यासाठीची ऑनलाइन, तसेच ऑफलाइन प्रक्रिया सुरू करण्याचा निरोप कानोकानी देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे प्रत्येक प्रभागनिहाय इच्छुक त्या कामांत शनिवारी गुंतल्याचे दिसून आले.
दोन्ही राजे—उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे—आपल्या गटाच्या उमेदवारावर आग्रही आहेत.
जागावाटप, उमेदवारांचे स्थलांतर, तडजोडी आणि नगराध्यक्षपदासाठीची नावे.
सोमवार, १७ नोव्हेंबर.
नाही, अद्यापही दोन्ही गटांमध्ये एकमत न झाल्याने यादी प्रलंबित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.