Mumbai, 11 June : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचा नागपूरमधील व्यावसायिक सारंग लखानी यांच्यासोबत विवाह निश्चित झाला आहे. हा विवाह सोहळा लवकरच मुंबईत होणार आहे. मात्र, रेवती आणि सारंग यांच्या लग्नाचे नागपूरमधील रिसेप्शन (स्वागत समारंभ) पुढे ढकलण्यात आले आहे. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबईतील पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी याबाबतचे भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते, हा काही पत्रकार परिषदेचा विषय नाही. पण माझे जे व्याही आहेत, व्यावसायिक अरुण लखानी यांनी नागपूरचे रिसेप्शन पुढे ढकलले आहे.
नागपूरच्या रिसेप्शनला अरुण लखानी (Arun Lakhani) यांच्याकडे तीन ते चार हजार लोकं येणार होते. पण, त्यांचं म्हणणं पडलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे व इतर जे आवाहन केले आहे, त्यामुळे लग्न ठरलं आहे, तर ते आपण वेळेवर करु. रिसेप्शन कधीही करता येतं. त्यानुसार लखानी फॅमिलीने नागपूरचे रिसेप्शन पुढे ढकले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह सोहळा येत्या २० जून रोजी मुंबईत पार पडणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे दोन्ही घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विवाहासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी हे भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यांना भाजपने चंद्रपूर विधान परिषद निडणुकीचे तिकिट दिले होते. त्या ठिकाणाहून उद्योजक अरुण लखानी हे बिनविरोध निवडून आले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने अरुण लखानी यांनी मुलाच्या विवाह सोहळ्याचे नागपूरमधील रिसेप्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.