Sadabhau Khot Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भडकले; ‘...मग निवडणुका घेताच कशाला?’

Nagar Parishad Election Result : राज्यातील नगरपालिका निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात नाराजी उसळली आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Vijaykumar Dudhale
  1. राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबरला जाहीर करण्याचा निर्णय झाल्याने सर्वच पक्षांकडून निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

  2. भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनीही हा निर्णय टीकेचा धनी ठरवत, “निवडणुका घेताच कशाला, जर निकाल पुढे ढकलणार असाल?” असा सवाल करत स्वायत्त संस्थांवर लोकांचा विश्वास ढासळत असल्याचे म्हटले आहे.

  3. चंद्रपूर आणि वर्धा येथील दोन भाजप कार्यकर्त्यांनी निकाल पुढे ढकलण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती, ज्यावर २१ डिसेंबरला मतमोजणीचे आदेश देण्यात आले.

Sangli, 02 December : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आता तीन ऐवजी २१ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या कारभारविरोधात सर्वच पक्षीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनीही आयोगाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यात आता रयत क्रांती संघटनेचे नेते तथा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांचीही भर पडली आहे. नगरपरिषदेचा निकाल पुढे ढकलता तर मग निवडणुकाच कशाला घेता, असा सवाल त्यांनी आयोगाला केला आहे.

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी येत्या २१ डिसेंबर रोजी करण्याचे आदेश दिले आहेत. देशातील ज्या स्वायत्त संस्था आहेत (निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत). लोकसभा, राज्यसभा, विधान सभा, विधान परिषद, सरकार हे सर्वजण आता मर्यादा ओलांडून काम करत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे जनतेच्या विश्वासाला कुठेतरी तडा जात आहे, याचं भान लोकशाही मानणाऱ्या या देशातील स्वायत्त संस्थांसह कोणालाही राहिलेले नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

तुम्ही एका बाजूला निवडणूक (Election) निकाल जाहीर करण्याचा निर्णय पुढे ढकलता; मग निवडणुका घेताच कशासाठी? जनतेचा वेळ मोठ्या प्रमाणात खर्ची पडत आहे. आर्थिक बोजाही जनतेवर पडत आहे. कारण जनता त्यामध्ये गुरफटून राहते. आम्ही मतदान केले आहे, त्यात काय होणार, कोण निवडून येणार या सगळ्या चर्चांमध्ये जनतेची वैचारिक भूमिका त्याभोवती फिरत राहते. त्याचा परिणाम कौटुंबीक, आर्थिकदृष्ट्या होत असतो, असा दावाही सदाभाऊंनी केला.

ते म्हणाले, जसा सूर्योदय होतो, तसं त्याच्या रथाला असंख्य घोडे असतात. ते घोडे चारही दिशेला त्या रथाला ओढत असतात. तसं या देशातील लोकशाहीमध्ये या स्वायत्त संस्था चारही दिशेने त्या रथाला ओढायला लागल्या आहेत. प्रत्येकाला वाटतं, मीच बलदंड आहे. खऱ्या अर्थाने जनतेशी कोणालाही देणंघेणं आहे, असं मला वाटत नाही.

भाजप कार्यकर्त्यांचीच याचिका

दरम्यान, नगरपालिका निवडणुका पुढे ढकलाव्यात, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगर पालिका क्षेत्रातील सचिन ढोणे, वर्धा जिल्ह्यातील प्रदीप ठाकूर यांनी याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. हे दोघेही भाजपचे कार्यकर्ते आहेत.

1) नगरपालिका निकाल पुढे का ढकलले गेले?

न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे मतमोजणीची तारीख २१ डिसेंबर निश्चित करण्यात आली.

2) नेमकी नाराजी कोण व्यक्त करत आहे?

सर्वच पक्षांबरोबर देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि आता सदाभाऊ खोत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

3) सदाभाऊ खोत यांनी कोणता मुद्दा मांडला?

निकाल पुढे ढकलणार असाल तर निवडणुकाच कशाला घेता, असे ते म्हणाले आणि स्वायत्त संस्थांवरील विश्वास कमी होत असल्याचा आरोप केला.

4) याचिका कोणी दाखल केली होती?

चंद्रपूरचे सचिन ढोणे आणि वर्ध्याचे प्रदीप ठाकूर—दोघेही भाजप कार्यकर्ते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT