Samadhan Autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Samadhan Autade's Challenge : भाजप आमदाराचे ओपन चॅलेंज; ‘टक्केवारी घेतल्याचे सिद्ध करा; राजकारण सोडतो’

हुकूम मुलाणी

Mangalvedha News : माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात कुठल्याही ठेकेदाराने सांगावे की मी टक्केवारी घेतली. मी टक्केवारी घेतल्याचे सिध्द केले तर मी राजकारण सोडेन. काय गरज आहे, टक्केवारीसाठी काम करायची. उगीच दुसऱ्यावर आरोप करायचे, याला भविष्यात उत्तर नक्कीच देऊ, असे सांगत विरोधकांना किती नाचायचे ते नाचू द्या, त्यांचे नाचणे बंद झाल्यावर पुन्हा आपणच त्यांना नाचवू, असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी दिला. (‘Prove the percentage taken; Quits politics': Samadhan Autade)

मंगळवेढा शहरात आज (ता. २६ जानेवारी) विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना आवताडे यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले. त्यामुळे आगामी काळात मंगळवेढ्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगणार हे आता स्पष्ट आहे. (Samadhan Autade's Challenge )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आवताडे म्हणाले,चांगल्या कामात बोटे घालण्याचे काम बंद करावे; नाहीतर आमदार काय चीज आहे, हे नक्कीच या पुढील काळात दाखवून देऊ, असा इशाराही आमदार आवताडे यांनी दिला. मंगळवेढा शहराच्या विकासासाठी आपण 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, त्या निधीतूनही शहराचा विकास मला पाहिजे तसा झाला नाही.

शहरातील सध्याच्या समस्या लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, त्याबाबतचा प्रस्ताव नगरपालिका प्रशासनाने वरिष्ठाकडे सादर करावा. मलाही त्यांची कल्पना द्यावी. अन्यथा मी व्यासपीठावर भाषण ठोकायचं आणि प्रत्यक्षात वेगळेच असायचे, असे न करता योग्य पद्धतीने काम करून शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू, असेही आमदार आवताडे यांनी स्पष्ट केले.

नागणेवाडी परिसरातील रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे व जागेचे उतारे मिळवून देण्याचा विषरु येत्या काही दिवसांत सोडविण्यात येईल, असेही आवताडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत माने आदी उपस्थित होते.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT