Parth Pawar Meet Gaja Marane : कुख्यात गुंड गजा मारणेची भेट कशी झाली?; पार्थ पवारांच्या गोटातून आले स्पष्टीकरण

Kothrud Tour : पार्थ पवार यांचा गुरुवारी झालेला कोथरुडचा दौरा चर्चेचा ठरला आहे. कारण, त्यात त्यांनी दोनवेळा `मोक्का`ची कारवाई झालेला कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणेची भेट घेतली.
Parth Pawar -Gaja Marane
Parth Pawar -Gaja Marane Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मावळमधील लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीतील पराभवानंतर काहीसे राजकीय विजनवासात गेलेले उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यातही अजितदादांनी टार्गेट केलेला शिरूर लोकसभा आणि बालेकिल्ला पुणे जिल्ह्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातून त्यांचे सोलापूर जिल्ह्यात दौरे वाढले आहेत. (How did meet gangster Gaja Marne...?; Explanation came from Parth Pawar's group)

पार्थ पवार यांचा गुरुवारी झालेला कोथरुडचा दौरा चर्चेचा ठरला आहे. कारण, त्यात त्यांनी दोनवेळा `मोक्का`ची कारवाई झालेला कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणेची भेट घेतली. त्यावरून पुण्याच्या राजकीय क्षेत्रात वादळ उठले आहे. त्यावरून अजित पवारांच्या विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले. या भेटीची चर्चा अजूनही सुरुच आहे. कारण त्यामागील नेमके कारण समजले नव्हते. त्याचा ‘सरकारनामा’ने शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नेमके कारण समोर आले आहे. (Parth Pawar Meet Gaja Marane )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parth Pawar -Gaja Marane
Solapur Water Issue : ‘उजनीतील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव; शेतीला आवर्तन नाहीच’

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पार्थ पवार हे पुन्हा राजकारणात ॲक्टिव्ह झाले आहेत. त्यात त्यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचा दौरा नुकताच केला. त्यानंतर गुरुवारी ते कोथरुडला होते. त्यातून ते राज्य पातळीवरील राजकारणात सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत.

अजित पवारांप्रमाणे पार्थ यांचेही लक्ष्य पुणे शहर, जिल्हा व शिरुर लोकसभा असल्याचे समजते. त्यातूनच त्यांनी कोथरुडचा दौरा केला. त्यात अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. अनेकांच्या घरी ते गेले. पक्षाच्या माजी नगरसेविका आणि गजा मारणेची पत्नी जयश्री यांचाही त्यात समावेश होता. यावेळी पक्षाचे पदाधिकारीही त्यांच्याबरोबर होते. पक्षाच्या माजी नगरसेविका असल्याने जयश्री मारणेंच्या घरीही ते गेले. त्यावेळी तेथे त्यांचा पती म्हणजे गजानन मारणेही उपस्थित असणे, हे ओघाने आले, असे पार्थ यांच्या गोटातून आज सांगण्यात आले.

Parth Pawar -Gaja Marane
BJP Election Strategy : अशोक चव्हाणांना घेरण्याची भाजपची रणनीती; तरुण नेत्यावर दिली महत्वपूर्ण जबाबदारी

दरम्यान, पार्थ यांच्या वाढत्या दौऱ्यामुळे ते राज्य पातळीवरील राजकारणात ॲक्टिव्ह होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यातून ते आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करतील. तसेच पक्ष संघटनेवर अधिक भर देण्याची शक्यता आहे. त्यातून पुन्हा मावळ अथवा शिरूरमधून ते लोकसभा लढण्याची शक्यता धूसर झाली आहे. मावळात ते फिरकत नसल्यामुळे त्याला पुष्टी मिळत आहे.

Parth Pawar -Gaja Marane
Rajan Patils Controversial Statement : राजन पाटलांचे पुन्हा वादग्रस्त विधान; आमदार यशवंत मानेंना काय म्हणाले पाहा...

पार्थ पवार हे स्वतः निवडून न येता दुसऱ्यांना (पक्षाचे उमेदवार) निवडून आणण्याची म्हणजे गॉडफादरची भूमिका निभावणार असल्याचे त्यांच्या दौऱ्यांतून स्पष्ट होत आहे. दरम्यान, निवडून आणलेल्या आमदारांच्या ताकदीवर विधान परिषद अथवा राज्यसभेवरही ते नंतर जाऊ शकतात.

Edited By : Vijay Dudhale

Parth Pawar -Gaja Marane
Karnataka Politics : ‘आमदारकी, सन्मान देऊनही माजी मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केला’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com