Baramati News : मी अनेकदा बोलत नाही, प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ माझी सेटिंग आहे, असा अजिबात नाही. ‘अरे’ला ‘का रे’ म्हणायला फार ताकद लागत नाही. पण, एखादा अरे म्हटला तरी गप्प बसून सहन करायला खूप ताकद लागते, त्यामुळे कमी बोला. आपली लढाई इथल्यांशी नाहीच, जी अदृश्य शक्ती मराठी माणसाच्या विरोधात आहे, त्या शक्तीच्या विरोधात आपली लढाई आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (Our fight is against the invisible power in Delhi : Supriya Sule)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप आज बारामतीत करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी विरोधकांकडून होणाऱ्या प्रत्येक आरोपांवर आपण बोलत नसल्याचे स्पष्ट केले. आगामी काळात आपण संघर्ष करणार असल्याचे सुळे यांनी या वेळी स्पष्ट केले. (Supriya Sule Speech )
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामतीत आज सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर बोलण्यापेक्षा भाजवर हल्ला करणे पसंत केले. त्यांनी भाजप नेत्यांना अनेक चिमटे काढले. आपली लढाई ही भारतीय जतना पक्षाशी आहे, स्थानिकांशी नाही, त्यामुळे वैयक्तीक टिकाटिपण्णी टाळावी, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना बोलताना केले.
भाजप कार्यकर्त्यांनी फक्त कष्ट करायचे, त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या. कारण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या लोकांना मुख्यमंत्री केले जात आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेले. मात्र, भाजपमध्ये जाऊन ते मुख्यमंत्री झाले. भाजपच्या नेत्यांना बाजूला सारण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते पूर्वीही विरोधात होते आणि आताही सत्तेच्या बाहेरच आहेत, असे उदाहरणही त्यांनी दिले.
सुळे म्हणाल्या, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे यांनी अनेक आरोप केले. मात्र, त्याच मुश्रीफांसोबत ते आज मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यामुळे चूक कोण आणि बरोबर कोण, हे त्यांनी आता सांगण्याची गरज आहे.
काही वकिल सागर बघायला जातात
राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याबाबत सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर युक्तिवाद सुरू आहे. सगळी कागदपत्रे दिल्लीतून इंग्रजीमधून आली आहेत. वकिलही दिल्लीतूनच येतात. मार्गदर्शनही दिल्लीतूनच होते. काही वकिल असं सांगतात (सदानंद सुळे यांचे काही वकिल हे वर्गमित्र आहेत) की, ते मुंबईत सागर बघायला जातात (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाचे नावही सागर आहे). सागर म्हणजे समुद्र. उगीचच गैरसमज नसावा, असे स्पष्टीकरणही सुळे यांनी दिले. मात्र, पक्ष आणि घरे फोडणाऱ्याविरोधात आम्ही लढणार, असेही त्यांनी नमूद केले.
कोणतं मंगळसूत्र घालता, असा प्रश्न असू शकतो का
सर्वेक्षणात महिलांना ‘तुम्ही कोणतं मंगळसूत्र घालता’ असा प्रश्न विचारला जात आहे. असा प्रश्न विचारला कसा जाऊ शकतो, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. तुम्ही आरक्षण देतो की महिलांची चेष्टा करताय, हे स्पष्ट करावे, असे आवाहनही सुळे यांनी केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.