Samarjeet Singh Ghatge 
पश्चिम महाराष्ट्र

Samarjeet Ghatge: मुश्रीफ अन् घाटगेंची युती! समरजीतसिंहांनी काढलं पत्रक; म्हणाले, पारंपारिक विरोधक...

Samarjeet Ghatge: खरं म्हणजे याबाबतीत आपल्या गटाच्या परंपरेप्रमाणं आपल्या सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Amit Ujagare

Samarjeet Ghatge: कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्यासोबत युती करणाऱ्या समरजीत सिंह घाटगे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक पत्रक काढलं आहे. या पत्रकातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

घाटगे निवेदनात म्हणतात, श्री छत्रपती शाहू आघाडीमधील सर्व कार्यकर्त्यांना नमस्कार, आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की कागल व मुरगूड नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आपल्या शाहू आघाडीमार्फत ही निवडणूक ताकतीने लढविण्यासाठी आपण सर्वांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात अनपेक्षितपणे घडामोडी झाल्या. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी केलेल्या भावनिक आवाहनानुसार यामध्ये आपल्याला पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाशी युती करावी लागली.

खरं म्हणजे याबाबतीत आपल्या गटाच्या परंपरेप्रमाणे आपल्या सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, अतिशय कमी वेळात याबाबतीत निर्णय घेऊन तडजोड करणे आवश्यक होते. कागल, मुरगूड शहर व तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने व आपल्या शाहू आघाडीतील सर्व कार्यकर्ते यांना बळ देण्याच्या दृष्टीने असा निर्णय घ्यावा लागला.

अर्थात आपल्या गटाच्यादृष्टीने निवडणुकीत युती किंवा तडजोडीबाबतचा असा निर्णय घेण्याची ही काही पहिली वेळ आहे असं नाही, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान राजेसाहेब यांनी सुद्धा कागलच्या शाश्वत विकासाच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून असे निर्णय घेतले होते व त्यास आपण सर्वांनी विश्वासाने साथ दिली होती, हा इतिहास आहे. याचीच पुनरावृत्ती या निमित्ताने झालेली आहे.

याबाबतीत आपणा शाहू आघाडीतील सर्वांशी व युती झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांशी संयुक्तपणे संवाद साधण्यासाठी उद्या मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मटकरी हॉल कागल इथं सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद होत आहे. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत संयुक्तपणे आम्ही याबाबतची भूमिका मांडू.

राजेसाहेब यांच्या संकल्पनेतील कागलच्या शाश्वत विकासासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांच्याच आदर्शांप्रमाणं यानिमित्ताने तडजोड केली आहे. कागल व मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत शाहू आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या आघाडीचे नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया असं आवाहन या निमित्ताने करतो, अशा सविस्तर शब्दांमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी आपली भूमिका मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT