Sangli Lok Sabha News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Lok Sabha News : अकोल्यात मतदान होताच आंबेडकरांचा शेंडगेंना 440 व्होल्ट्सचा झटका...

Chetan Zadpe

Sangli News : सांगली लोकसभेत वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना वेग आहे. विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आता अपक्ष पाटील यांना वंचित बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. पाटील यांनी काँग्रेस नेत्यांच्या मध्यस्थीला न जुमानता उमेदवारी कायम ठेवली आहे, तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगेही रिंगणात असल्यामुळे ही लढत तिरंगी न होता बहुरंगी झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिली होता. मात्र, आज त्यांनी विशाल पाटील यांना अचानक पाठिंबा जाहीर केला आहे. आज वंचितने लोकसभेसाठी आणखी तीन जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. यासोबतच त्यांनी सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. यामुळे त्यांनी यापूर्वी येथे प्रकाश शेंडगेंना दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील निवडणुकीत उभे राहणार असतील तर आपण त्यांना पाठिंबा देऊ, असे जाहीर आश्वासन दिले आहे. वंचितने ही मोठी भूमिका घेतली आहे. विशाल पाटील यांना पाठिंबा देऊ आणि त्यांना निवडूनही आणू, असं वक्तव्य आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

आंबेडकरांची बातमी -

विशाल पाटील (Vishal Patil) यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकरांनी प्रतीक पाटील यांच्याद्वारे विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आंबेडकर आणि प्रतीक पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेट घडली होती.

आंबेडकर काय म्हणाले?

चार दिवसांपूर्वी मला प्रतीक पाटील भेटून गेले. ते मला म्हणाले काय करायचं? मी म्हणालो, हिंमत असेल तर लढा. तुम्ही लढायची हिंमत दाखवली तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. आता बघूया, या पाटलांमध्ये हिंमत आहे की नाही? त्यांनी लढायची हिंमत दाखवली तर पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणू, अशी ग्वाही देतो, असे आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT