Nana Patole Vishal Patil, Sanjay Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Loksabha 2024 : 'विशाल पाटलांच्या पुनर्वसनाचा प्रश्नच नाही...'; नाना पटोलेंनी संजय राऊतांना सुनावले

Roshan More

Loksabha Election 2024 : संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर काँग्रेस कार्यकर्ते ठाम आहेत, तर विशाल पाटील हे संसदेत यापुढे कसे जातील, याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल, असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. विशाल पाटील (Vishal Patil) यांचे पुनर्वसन केले जाईल, असे संकेतदेखील दिले. मात्र, सांगलीची जागा काँग्रेसचीच असल्याचे पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

सांगलीच्या बाबतीत शिवसेनेने असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही. सांगलीचा विषय हायकमांडकडे पाठवला आहे. विशाल पाटील यांच्या पुनर्वसनाचा हा प्रश्न नाही. सांगलीची जागा ही काँग्रेसचीच आहे आणि विशाल पाटील यांना उमेदवारी फायनल झाली होती. हा तिढा लवकरच सुटेल, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत (Sanjay Raut) हे आज सांगलीत आले आहेत. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. जोपर्यंत हायकमांड यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत प्रचारात सामील होणार नसल्याचा फैसाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. तर, विश्वजित कदम यांनीदेखील सांगलीवर काँग्रेसचाच दावा असल्याचे सांगितले आहे.

विदर्भात काँग्रेस जिंकेल

पहिल्या टप्प्यात विदर्भामध्ये निवडणूक होत आहे. या पहिल्या टप्प्यातील पाचही जागा काँग्रेस जिंकेल तसेच दुसऱ्या टप्प्यातील अकोल्यासह बहुतांश जागा काँग्रेस जिंकेल, अशी परिस्थिती आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच 'वंचित'च्या पुढे आम्ही दोस्तीचा हात केला आहे. काँग्रेस त्यांना दोन जागा देण्यास तयार आहे. आमचा प्रस्ताव ते मान्य करतील, अशी आशादेखील पटोले यांनी व्यक्त केली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT