Chandrahar Patal  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Loksabha : चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेण्याची तयारी...,सांगलीचा तिढा सुटणार?

Loksabha Election :विशाल पाटील यांनी आज अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मात्र, ते पुन्हा काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नाहीत.

Roshan More

Sangli Political News : सांगली लोकसभेची जागा शिवसेना (ठाकरे गट) लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जागेवरून विशाल पाटील आक्रमक झाले असून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटीलांच्या बंडखोरीमुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना फटका बसल्याची शक्यता आहे. मात्र, आपली उमेदवारी मागे घेण्याबाबत चंद्रहार पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी आहे. फक्त शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला नको, असे काँग्रेसने उघडपणे सांगवे,असे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) म्हणाले आहेत. मला मान्य आहे मी माजी मुख्यमंत्र्याचा नातू नाही. माझ्याकडे कारखाना नाही. माझी उमेदवारी चार वेळा घोषित होऊनही महाविकास आघाडीतील घटक पक्ष आमच्या पासून लांब आहेत. शेतकऱ्याच्या मुलगा खासदार होतोय की शिवसेनेचा (Shivsena) खासदार होतोय, नेमकं याचं दुखण काय आहे, हे मला कळत नाही. असे देखील चंद्रहार पाटील म्हणाले.

काँग्रेसकडून अर्ज दाखल करणार

विशाल पाटील यांनी आज अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मात्र, ते पुन्हा काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांना काँग्रेसचा एबी फाॅर्म मिळणार का याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हायकमांडला भेटले

सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याने विशाल पाटील, विश्वजीत कदम यांनी उघड नाराजी व्यक्त केली. ही जागा काँग्रेसलाच मिळावी म्हणून विशाल पाटील,विश्वजीत कदम हे दिल्लीत पक्षश्रेष्ठांना भेटले. आपल्या मागणीचे निवेदन देखील त्यांनी दिले होते. मात्र, महाविकास आघाडीची नुकतीच पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगलीची जागा ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT