Sangli politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Municipal Politics : महापालिकेचे राजकारण जीवावर उठले : सांगलीत भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला; शिवसेनेच्या उमेदवारावार आरोप

Sangli Municipal Election : सांगली महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेनेतील संघर्ष हिंसक वळणावर पोहोचला असून, व्हनमाने विरुद्ध व्हनखंडे वादामुळे राजकारण तापले आहे.

Rahul Gadkar

Sangli Miraj Kupwad News : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना ही एकमेकांच्या विरोधात लढत आहे. निवडणुकीवरून सुरू झालेला संघर्ष आता एकमेकांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद आणखीन उफाळून येण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवाराच्या घरावर मध्यरात्री दोघा अज्ञातांनी हल्ला केला आहे. या प्रकारानंतर महापालिका राजकारणात खळबळ उडाली आहे.

प्रभाग तीनमध्ये भाजप उमेदवाराच्या सुनीता व्हनमाने यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्ला करून गाड्यांची मोडतोड करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिंदेसेना समर्थकांनी हल्ला केल्याची तक्रार व्हनमाने यांनी दिली आहे. मात्र शिवसेनेचे सागर व्हनखंडे यांनी यासंदर्भात निषेध व्यक्त करून आरोप फेटाळून लावले आहेत.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेना ही एकमेकांच्या विरोधात लढत आहे. जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर अंतर्गत संघर्ष टोकाला गेला होता. मात्र मैत्रीपूर्ण लढतीत निवडणूक पार करण्याच्या निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार मिरज प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित प्रवर्गातून भाजपच्या सुनीता व्हनमाने विरुद्ध शिवसेनेचे सागर व्हनखंडे अशी लढत होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी या दोन गटात तणाव निर्माण होऊन कोयतता हल्ल्याचा प्रकार घडला होता. मात्र हे प्रकरण आपापसात मिटवण्यात आले.

मात्र आज मध्यरात्री भाजपच्या उमेदवार व्हनमाने यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. व्हनमाने यांच्या तक्रारीनुसार 10 जणांच्या टोळीने घरावर हल्ला केला. यावेळी घरासमोर असलेल्या चारचाकीवर कोयता मारून काचा फोडण्यात आल्या. दुचाकीची मोडतोड करण्यात आली. यावेळी व्हनमाने समर्थकही जमल्याने हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले. 

यातील दोघे संशयित हत्या प्रकरणातील आरोपी असून त्यांनी अर्ज माघार घे असे धमकावल्याची तक्रार सुनीता व्हनमाने यांचे पुत्र संदीप व्हनमाने यांनी केली. शिवसेनेचे उमेदवार सागर व्हनखंडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप व्हनमाने यांनी केला. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसही तासभर उशीरा आल्याची तक्रार व्हनमाने यांनी केली. हल्ल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण झाले आहे. त्यावरून पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT