सांगलीतील इंदिरानगर परिसरातून बेपत्ता झालेल्या रोहित म्हैसाळे या बांधकाम कामगाराचा निघृण खून झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी मुख्य आरोपी श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे याला अटक केली.
मित्र शाहरूख शेखच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच रोहितचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
sangli News : इंदिरानगर परिसरातून बेपत्ता झालेल्या रोहित मुकेश म्हैसाळे (वय २९) या बांधकाम कामगाराचा निघृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी मुख्य सूत्रधार श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय २६, रा. सावंत प्लॉट, इंदिरानगर) या अटक केली आहे. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता, त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात रोहितच्या खुनामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. “खून का बदला खून” (मित्राच्या खूनाच्या बदल्यात) म्हणत रोहितचा काटा काढल्याचा कबुली जबाब गोट्याने दिला आहे.
इंदिरानगर परिसरातून बांधकाम कामगारा बेपत्ता झाला होता. रोहित मुकेश म्हैसाळे (वय २९) असे या सेंट्रिंग कामगाराचे नाव असून त्याचा निघृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे याला शुक्रवारी ताब्यात घेत अटक केली होती.
यावेळी पोलिसांनी केलेल्या तापासात शहरातून हद्दपार असणारा म्हैशाळे यांच्या खुनाचा मुख्य संशयित आरोपी श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे असल्याचे समोर आले. यावेळी त्याला शहरातील एका पडक्या इमारतीतून अटक करण्यात आली आहे. यावेळी रोहितचे अपहरण करून विठ्ठलनगर येथील एका पडक्या इमारती कोयत्याने खून करण्यात आल्याचे उघड झाले होते.
ही डार्क स्पॉट म्हणून ओळखल्या जाणारी पडकी इमारती अनेक गुंडाचा नशापाणीचा अड्डा असल्याचे समोर आले. तर गुंडाचा अड्डा असल्यानेच जाण्याची कोणाची हिंमत होत नसे. याचाच फायदा घेत गोट्याने रोहितचा काटा येथे काढला. तसेच रोहितचा मृतदेह बॅरेलमध्ये भरला, त्यात जड दगडेही भरली आणि तो तेथेच असणाऱ्या विहिरीत फेकून दिला. धक्कादायक म्हणजे गोट्या मृतदेह फेकलेल्या विहिरीतच आंघोळ करायचा हे देखील आता उघड झाले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी यापूर्वी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला.
यानंतर आता पोलिसांच्या तपासात खुनामागचे धक्कादायक कारण समोर आले असून मित्र शाहरूख शेख याच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच रोहितचा काटा काढल्याची कबुली त्याने दिली आहे. याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, गोट्या कलढोणेचा मित्र शाहरुख शेख याला रोहितने उत्तम मोहिते याच्या वाढदिवसाला सोबत नेले होते. येथे मोहिते आणि शाहरूख यांच्यात वाद झाला ज्यात मोहिते याने केलेल्या खूनी हल्ल्यात शाहरूखचा मृत्यू झाला होता.
तर मित्र शाहरूखच्या मृत्यूस रोहितच कारणीभूत असल्याचा राग गोट्याच्या मनात होता. याच रागातून गोट्या कलढोणे याने रोहितचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान आता २६ फेब्रुवारी पोलिस ठाण्यात रोहितच्या बेपत्ता ऐवजी गोट्या कलढोणे व त्याच्या साथीदारांनी अपहरणाची फिर्याद दिली असती तर आज रोहितचे प्राण वाचले असते, ही गोष्टी पुढे येते आहे.
FAQs :
1. रोहित म्हैसाळे खून प्रकरणात कोणाला अटक झाली आहे?
या प्रकरणात श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
2. रोहित म्हैसाळे कोण होते?
रोहित म्हैसाळे हे २९ वर्षांचे बांधकाम सेंट्रिंग कामगार होते.
3. खून का करण्यात आला?
मित्र शाहरूख शेखच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रोहितचा खून केल्याची आरोपीने कबुली दिली.
4. या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?
या प्रकरणाचा तपास सांगलीतील विश्रामबाग पोलीस करत आहेत.
5. ही घटना कुठे घडली?
ही घटना सांगली शहरातील इंदिरानगर परिसरात घडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.