

• सांगलीतील इंदिरानगर परिसरातील रोहित म्हैशाळे बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना त्यांचा खून झाल्याचे उघड झाले.
• पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे याला शहरातील एका पडक्या इमारतीतून अटक केली.
• रोहित याचे अपहरण करून विठ्ठलनगर परिसरात कोयत्याने हत्या करून मृतदेह बॅरेलमध्ये भरून विहिरीत फेकण्यात आल्याचे समोर आले.
sangli Crime News : बेपत्ता झालेल्या इंदिरानगर येथील रोहित म्हैशाळे यांचा खून झाल्याचे उघड होताच सांगली पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. शहरातून हद्दपार असणारा आणि म्हैशाळे यांच्या खुनाचा मुख्य संशयित आरोपी श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे हे स्पष्ट झाल्यानंतर त्याला शहरातील एका पडक्या इमारतीतून अटक करण्यात आली आहे. रोहित याचे अपहरण करून विठ्ठलनगर येथे कोयत्याने खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅरेलमध्ये भरून तो विहिरीत फेकून देण्यात आला होता.
गोट्या कलढोणे याच्यावर शहर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती, तरीही त्याचा वावर घटनास्थळावरील पडीक इमारतीत होता. त्याला डार्क स्पॉट म्हणून ओळखत. अनेक गुंडाचा त्या ठिकाणी नशापाणी करण्याचा अड्डा असल्याने वर जाण्याची कोणाची हिंमत नव्हती.
त्यात गोट्याचाही तिथेच ठिय्या असायचा. तो रात्रभर त्याठिकाणी झोपायचा. मृतदेह फेकलेल्या विहिरीत तो आंघोळ करायचा, असा त्याचा दिनक्रम होता. हे पोलिसांसह अनेकांना माहिती होते. मात्र, त्या 'डार्क स्पॉट'वर जाऊन कारवाईची हिंमत आजपर्यंत कोणी दाखवली नाही. दरम्यान, हद्दपार गुन्हेगाराने केलेल्या खुन केल्याने शहरात खळबळ उडाली.
मिळालेली माहिती अशी की, रोहित म्हैशाळे हा इंदिरानगर परिसरात राहायचा. २६ फेब्रुवारीला सकाळी सात वाजता तो आईच्या जागी कामावर गेला होता. जिल्हा परिषदेसमोर सकाळी सव्वा सातच्या सुमारास त्याने वडिलांकडे पैसे मागितले होते. त्यानंतर काही वेळातच दुचाकीवरून आलेल्या गोट्यासह तिघांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादाच्या दरम्यान रोहितने तेथून पळत काढला होता. तो तेथून पळत सुटला होता. त्यानंतर त्याचे अपहरण करून विठ्ठलनगर येथील एका शाळेजवळ त्याला नेण्यात आले. तेथे पडीक इमारतीत त्याच्यावर कोत्याने सपासप वार करत त्याला ठार मारण्यात आले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी गोट्यासह दोघा अल्पवयीन मुलांनी बॅरेलमध्ये रोहितचा मृतदेह कोंबला. त्यानंतर तो दगड ठेवून विहिरीत फेकून दिला. दरम्यान, विश्रामबाग पोलिसांनी या गुन्ह्यात अत्यंत हुशारीने तपास करत आठ दिवसांत खूनाचा छडा लावला आहे.
FAQs :
1. रोहित म्हैशाळे प्रकरणात काय घडले?
रोहित म्हैशाळे यांचे अपहरण करून त्यांची कोयत्याने हत्या करण्यात आली आणि मृतदेह बॅरेलमध्ये भरून विहिरीत फेकण्यात आला.
2. या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे?
श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे हा या खुनाचा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
3. आरोपीला कुठे अटक करण्यात आली?
पोलिसांनी त्याला शहरातील एका पडक्या इमारतीतून अटक केली.
4. खून कुठे करण्यात आला होता?
रोहित म्हैशाळे यांचा खून विठ्ठलनगर परिसरातील सुनसान जागेत करण्यात आला.
5. या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?
सांगली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.